छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानावर असलेली मालिका म्हणजे ‘आई कुठे काय करते’. या मालिकेला घेऊन प्रेक्षकांची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळतेय. या मालिकेत येणारे ट्विस्ट हे मालिकेच्या प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवण्यास मदत करतात. दरम्यान सध्या मालिकेत इशाच्या साखरपुड्याचा ट्रॅक सुरू आहे. अशातच आता आशुतोषच्या बहिणीची एंट्री होणार आहे. (Aai Kuthe Kay Karte Update)
मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांना आशुतोषच्या बहिणीची उत्सुकता लागून राहिली आहे. असे असताना आज प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली आहे. मालिकेच्या आजच्या भागात अखेर वीणाची एंट्री होताना दिसणार आहे. वीणाच्या अचानक आल्याने सगळ्यांनाच धक्का बसणार आहे. मात्र वीणा ही आशुतोषची सख्खी बहीण नाहीये याचा उलगडा देखील आजच्या या भागात होणार आहे.
पहा आई कुठे काय करतेच्या आजच्या भागात काय घडलं (Aai Kuthe Kay Karte Update)
आजच्या भागात असे पाहायला मिळणार आहे की, इशाच्या साखरपुड्याच्या निमित्ताने देशमुखांच्या घरी धामधूम सुरु असते. अभिषेक, यश, संजना, अनिशची आई, सगळेच मिळून डान्स करताना दिसणार आहेत. या सगळ्या कार्यक्रमादरम्यान अरुंधतीच गाणं हे लक्षणीय ठरणार आहे. नावाचं फ्युजन हे ट्रेंड सुरु असल्याने मालिकेतही हा ट्रेंड फॉलो होताना दिसणार आहे. अरुंधती स्वतः अनिश आणि इशा यांना त्यांच्या नावाचं फ्युजन करून देणार आहे. हे पाहून इशाचा आनंद द्विगुणित झालेला पाहायला मिळणार आहे.(Aai Kuthe Kay Karte Update)
हे देखील वाचा – शाहीर साबळे नंतर अंकुश चौधरी दिसणार महादेवाच्या भूमिकेत ?
या सगळ्यात मालिकेतील सर्वत मोठं सरप्राईझ समोर येणार आहे, वीणा अचानक एंट्री करून येताना दिसणार आहे. साखरपुड्याला वीणाच्या येण्याने सगळयांना मोठं सरप्राइज मिळणार आहे. वीणाला अचानक आलेलं पाहून सुलेखा ताई भावुक होणार आहेत. बऱ्याच वर्षांनीही वीणाला आलेलं पाहून सगळ्यांनाच आनंद झालेला असतो. (Aai Kuthe Kay Karte Update)
त्यानंतर सुलेखा ताई वीणाची ओळख करून देतात. तेव्हा त्या सांगतात की वीणा त्यांची सख्खी मुलगी नाही आहे ती त्यांच्या नणंदेची मुलगी आहे. मात्र ती आपल्यासाठी आपलीच मुलगी आहे असं देखील सुलेखाताई म्हणतात. एकूणच आता वीणाच्या एंट्रीने आशुतोष आणि अरुंधतीच्या आयुष्यात वादळ येणार का हे पाहणं रंजक ठरणार आहे.
