आई कुठे काय करते ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्रावर चाहते भरभरून प्रेम करतात. या मालिकेचं कथानक अरुंधतीभोवती फिरताना दिसत आहे.नुकतंच अरुंधतीने आशुतोशसोबत लग्न करून नव्या आयुष्याला सुरुवात केली. तिच्या या निर्णयाला चाहत्यांनी चांगला पाठींबा दिला. पण अनिरुद्धचा राग मात्र कायम आहे. तो अरुंधतीला टोमणा मारण्याची संधी कायम शोधत असतो.नुकतंच समोर आलेल्या प्रोमोमध्ये देखील असच काही पाहायला मिळतंय. नुकतंच मालिकेत गौरीने यशासोबत साखरपुडा तोडला. यश हा पुन्हा एकदा खचला आहे. गौरी आणि यश यांचं नातं तुटलं असून गौरीने यशला त्यांच्या साखरपुड्याची अंगठी परत दिली. यश आणि गौरी हे अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये आहेत. मात्र आई वडिलांची काळजी घेण्यासाठी आणि काम करण्यासाठी ती अमेरिकेला पुन्हा गेली. तर यावरून अरुंधती यशाची समजूत काढते. तर अनिरुद्ध तिच्यासोबत वाद घालतो.(Aai Kuthe Kay karte episode )

समोर आलेल्या प्रोमोमध्ये,अरुंधती ही देशमुखांच्या घरी जाते. तेव्हा ती यशला समजवत असते घरी गौरीच्या या निर्णयाची चर्चा होतं असते.तेव्हा अनिरुद्ध येऊन गौरी बद्दल वाईट बोलतो त्यावेळी संजना त्याला प्रतिउत्तर देते हे पाहून यश चिडून निघून जातो.पण अनिरुद्ध मुद्दाम अजून बोलवा बाहेरच्यांना घरात म्हणजे घरच्यांमध्ये भांडण होणारच असं बोलतो. तर आता पुढे काय घडणार अरुंधती गौरीला यशाच्या आयुष्यात परत आणणार याकडे आता चाहत्यांचं लक्ष लागलंय.(Aai Kuthe Kay karte episode )
हे देखील वाचा- ‘मिसेस गोस्वामीं’ ची छोट्या पडद्यावर धमाकेदार एन्ट्री सचिन गोस्वामीं पाठोपाठ ‘या’ मालिकेत झळकणार
अनिरुद्ध नेहमीच अरुंधतीसोबत वाद घालण्यासाठी नवीन कारण शोधत असतो.तसेच नेहमी तिला टोमणे मारताना दिसतो. अरुंधती आणि आशुतोष यांचं लग्न होऊ नये यासाठी देखील त्याने अनेक प्रयत्न केले होते. पण अखेर अरुंधती आणि आशुतोष यांचा लग्नसोहळा पार पडलं. हीच गोष्ट अनिरुद्धच्या खटकत असून तो अरुंधतीला नेहमी सगळ्यांच्या नजरेतून उतरवण्याचा प्रयत्न करतो. तर आता यावेळी काय घडणार हे पाहणं उत्सुकतेचं असेल.