एक कलाकार हा एकाच वेळी नानाविध भूमिका साकारत असतो. रिल आणि रियल आयुष्याची सांगड घालताना प्रत्येक कलाकाराची तारेवरची कसरत सुरु असते. यावेळी अनेक अडचणींना तोंडी द्यावं लागतं. अशाच रील लाईफबद्दल सुप्रसिद्ध अभिनेते मिलिंद गवळी यांनी भाष्य केलं आहे..’आई कुठे काय करते’ या छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिकेतून घराघरात पोहोचलेले अभिनेते म्हणजे मिलिंद गवळी. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत मिलिंद गवळी यांनी अनिरुद्ध देशमुखची भूमिका साकारली. मालिकेत त्यांची नकारात्मक भूमिका असली तरी प्रेक्षकांनी या भूमिकेला अक्षरश: डोक्यावर घेतलं. अशातच मिलिंद गवळी यांनी याबाबतील काही सकारात्मक आणि नकारात्मक मुद्द्यावर चर्चा केली. (Milind Gawali on actor life)
दिलके करीबला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी असं म्हटलं की, “कलाकार किंवा अभिनेत्याने एकतर लग्नच करु नये. कारण हे एक असं प्रोफेशन आहे, ज्यात तुम्ही तुमची मानसिक स्थिती गमावता. तुम्ही तुमच्या भावना विकत असता. चित्रपट करत असताना तुम्ही शूटिंग करुन ३० दिवसांनी घरी आल्यानंतर डिटॉक्स करण्यासाठी ८-१० दिवसांचा वेळ मिळायचा. पण, मालिका करताना डिटॉक्स करण्यासाठी (भूमिकेतून बाहेर पडण्यासाठी) वेळ मिळत नाही. मी जर अनिरुद्ध देशमुख किंवा रवी भंडारकर साकारत असेन तर घरी अनिरुद्ध देशमुखही येऊ शकतो. तो तिथे सोडून घरी येता येत नाही. कारण दुसऱ्या दिवशी तोच अनिरुद्ध मी साकारतो. हे सलग ५ वर्ष काम करावं लागतं. त्यामुळे कुठेतरी मेडिटेशन किंवा अध्यात्म हे गरजेचं असतं”.
आणखी वाचा – हल्ल्यानंतर पहिल्यांदाच घराबाहेर पडला सैफ अली खान, कामाला नव्याने सुरुवात, पण अजूनही जखमा कायम, फोटो व्हायरल
मिलिंद गवळींनी याचा व्हिडीओ आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओसह त्यांनी कॅप्शनमध्ये असं म्हटलं आहे की, “मानसिक आरोग्य, मानसिक संतुलन, भावना एका कलाकाराच्या जीवनामध्ये याचे अनेक गोष्टी असतात ज्या अजिबात दिसत नाही त , कालांतराने त्या जाणवायला लागतात, बरेच वेळेला त्या कलाकाराला नाही पण त्याच्या आजूबाजूच्या लोकांना त्या प्रकर्षाने जाणवतात, बरेच वेळेला आपल्याला ऐकायला मिळतं की तू खूपच बदलला, तू असा नव्हता, तो असा वागेल असं वाटलंच नाही”.
आणखी वाचा – ‘दंगल’नंतर सान्या मल्होत्राचं उद्धवस्त झालेलं आयुष्य, अभिनेत्रीचं मोठं भाष्य, म्हणाली, “अशी अवस्था होती की…”
यापुढे मिलिंद असं म्हणाले की, “आपण म्हणतो ना भावनांशी खेळू नका, ते मानसिक संतुलनासाठी बरोबर नाही, पण एक कलाकार रोज त्याच्या भावनांशीच खेळत असतो आणि कालांतराने त्याचे परिणाम त्याला जाणवायला लागतात, खरं तर हा विषय खूप गहन आहे, आणि मी काही त्यातला तज्ञ नाही आहे, पण खरंच विचार करणारा हा विषय आहे”