‘आई कुठे काय करते’ ही मालिका अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. या मालिकेने स्वतःचा असा चाहतावर्ग निर्माण केला आहे. मालिकेच्या कथानकाने आजवर प्रेक्षकवर्गाला एकत्र बांधून ठेवलं आहे. गेली सव्वाचार वर्ष सुरु असलेली ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. मालिकेच्या कथानकाने साऱ्या प्रेक्षकवर्गाची उत्सुकता नेहमीच वाढवून ठेवली आहे. शिवाय मालिकेतील अरुंधती, संजना, अनिरुद्ध, कांचन, आप्पा, अनघा, अभिषेकमी यश, इशा ही देखील महत्त्वाची पात्र मालिकेच्या टीआरपीसाठी व लोकप्रियतेसाठी कारणीभूत आहेत असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. (Madhurani Prabhulkar Funny Video)
खऱ्या अर्थाने या मालिकेला बांधून ठेवणारी आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मधुराणी प्रभुलकर. मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणाऱ्या मधुराणी प्रभुलकरने तिच्या उत्तम अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेमुळे मधुराणी प्रचंड लोकप्रियता व प्रसिद्धी मिळाली आहे. मधुराणी सोशल मीडियावरदेखील तितकीच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. अशातच मधुराणीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडीओने साऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
आणखी वाचा – निळू भाऊंच्या बायोपिकचं दिग्दर्शक करणार प्रसाद ओक, नव्या कलाकाराला देणार संधी, म्हणाला, “पुढच्या वर्षी…”
मधुराणीने शेअर केलेला हा व्हिडीओ गमतीशीर असल्याचं दिसतंय. या व्हिडीओमध्ये मधुराणी हॉटेलमध्ये जेवायला गेली असल्याचं दिसत आहे. मात्र हॉटेलमध्ये गेल्यावर दुसऱ्यांच्या टेबलवर कोणती डिश आहे हे पाहून होणारी पंचाईत यावर तिने हा सुंदर असा व्हिडीओ शेअर केला आहे. “शेजारच्या डिशमध्ये काय ऑर्डर आहे हे हळूच बघून आपली ऑर्डर कशी द्यायची, याची ट्रिक”, असं म्हणत तिने हा व्हिडीओ शेअर करत हळूच मान वाकडी करत बाजूच्या टेबलवर नजर टाकलेली पाहायला मिळत आहे.
“शेजारच्या टेबलावरचे काय डिश आहे हे हळूच बघायचं आणि खावीशी वाटली की मग तीच डिश ऑर्डर करायची. तुम्ही करता का असं?”, असा सवाल चाहत्यांना करत तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे. सदर व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत सहमती दर्शविलेली पाहायला मिळत आहे.