शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

इतकं भव्य आणि प्रशस्त आहे ‘आई कुठे…’ फेम अभिनेत्रीचं घर, हॉलमधील ट्रॉफी व बक्षिसांनी वेधलं लक्ष, पाहा Inside Video

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 2, 2024 | 8:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Aai kuthe kay karte fame actress ashwini mahangade home inside video

इतकं भव्य आणि प्रशस्त आहे ‘आई कुठे...’ फेम अभिनेत्रीचं घर, हॉलमधील ट्रॉफी व बक्षिसांनी वेधलं लक्ष, पाहा Inside Video

‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे अश्विनी महांगडे. यामध्ये तिने अनघा ही भूमिका साकारली आहे. सोशल मीडियावर अश्विनीचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. अभिनयाप्रमाणेच ती तिची सामाजिक बांधिलकी सुद्धा आवर्जून जपते.  अनघाचा समजूतदारपणा, स्पष्टवक्तपणा या सर्व पैलूंमुळे अनघा या भूमिकेला प्रेक्षकांनी आपलसं केलं आहे. अश्विनी मालिकेमुळे जितकी चर्चेत असते तितकीच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेदेखील प्रकाशझोतात राहत असते. त्याचबरोबर अश्विनी समाजाप्रती असणारी जबाबदारीदेखील वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून पार पडत असते.

‘स्वराज्यरक्षक संभाजी’, ‘आई कुठे काय करते’ या मालिकांमुळे अश्विनी घराघरांत लोकप्रिय झाली. अशातच काही दिवसांपूर्वी तिने तिच्या हक्काचे नवीन घर घेतले. अश्विनी महांगडेची जवळची मैत्रीण माधुरी पोळने अभिनेत्रीच्या नव्या घराची पहिली झलक इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली होती. या फोटोमध्ये अभिनेत्रीच्या नव्या घराचा व्ह्यू आणि तिच्या हातात घराची किल्ली पाहायला मिळाली होती.

View this post on Instagram

A post shared by Asʜvɪɴɪ Pʀᴀᴅɪᴘᴋᴜᴍᴀʀ Mᴀʜᴀɴɢᴀᴅᴇ (@ashvinimahangade)

अश्विनी ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. अशातच तिने नुकत्याच शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये तिच्या गावाकडच्या घराची झलक पाहायला मिळत आहे. साताऱ्यामधील पसरणी हे अभिनेत्रीचे गाव असून तिचे घर अगदी भव्यदिव्य आहे. एका फोटोशूटनिमित्त शेअर केलेल्या व्हिडीओमधून तिच्या घराची झलक पाहायला मिळत आहे. भव्य हॉल आणि आतमध्ये अनेक खोल्यांचे हे घर आहे.

आणखी वाचा – “भावा कडक!”, ‘तुला शिकवीन…’मधील अधिपतीचा नवीन लूक पाहून चाहते फिदा, ‘त्या’ सीनसाठी घेतली अशी मेहनत, फोटो व्हायरल

अश्विनीच्या घराच्या हॉलमध्ये डाव्या बाजूला अनेक पुरस्कार व बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तसेच भिंतीवरील तलवारीनेदेखील सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. त्याचबरोबर तिच्या घरात छत्रपती शिवाजी महाराज यांची मोठी प्रतिमादेखील आहे. तसेच तिच्या ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतील भूमिकेचा एक फोटोही पाहायला मिळत आहे. आकर्षक रंग, आकर्षक इंटिरिअर व आकर्षक सजावटीच्या वस्तूंनी अश्विनीचे हे घर सजलेले आहे.  

आणखी वाचा – असा पार पडला एजे-लीला यांचा रिसेप्शन सोहळा, जहागीरदारांनी शूटिंगसह मजामस्तीही केली अन्…, BTS व्हिडीओ समोर  

दरम्यान, ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील अनघा असो किंवा ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील तिची ऐतहासिक भूमिका असो. अश्विनीने आपल्या प्रत्येक भूमिकेतून प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केलं आहे. लवकरच धर्मरक्षक अहिल्याबाई होळकर हा नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहे.    

Tags: aai kuthe kay karteAshwini Mahangadeashwini mahangade home marathi news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Saatvya Mulichi Saatvi Mulgi serial update Rupali Grows Suspicious Recalling a Word

'ते' सांकेतिक वाक्य रुपालीला समजणार, विरोचकाविरुद्ध विणलेल्या जाळ्यात राजाध्यक्ष स्वतःच अडकणार, नेत्रा वाचवू शकेल का?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.