आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ही स्वस्त न बसणारी एक व्यक्ती असतेच ती म्हणजे आई. घरात असो वा घरापासून लांब सतत व्यस्त राहणं हे तिच्या मुलं स्वभावातच असावं. हे झालं रिअल लाईफ आईचं पण रील लाईफ मध्ये सगळी कडे आईच्या भूमिकेतून लोकप्रिय असलेली अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर म्हणजेच मालिकेतील आई बाबत देखील असच काहीस घडलंय.(Madhurani Prabhulkar Australia Trip)
आई कुठे काय करते मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री मधुराणी आपल्या मुली सोबत ऑस्ट्रेलिया ट्रिप वर गेली आहे. पण शांत बसेल ती आई कसली याची प्रचिती अरुंधतीच्या एका व्हिडीओ वरून आलीये. सिडनी येथे असताना तेथे असणाऱ्या काही साहित्यप्रेमींना सोबत कवितेचं पण या मधुराणीच्या जुन्या कार्यक्रमाला पुन्हा गती देण्यासाठी त्या कार्यक्रमाचं अनेक भाग शूट करण्यात घाट मधुराणीने तिथे घातलाय. त्या संदर्भात तिने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

या पोस्टच्या कॅप्शन मध्ये तिने लिहीलय ‘ ‘सिडनी ‘कवितेचं पान’ प्रेप्स ‘
सिडनीमध्ये अनेक वर्षं राहणाऱ्या तरीही आपल्या भाषेवर आणि साहित्यावर प्रचंड प्रेम करणाऱ्या कविमनांच्या काही मंडळीबरोबर ‘कवितेचं पान’ चे ३ भाग चित्रित केले.’ प्रेक्षकांनी अरुंधतीच्या व्हिडिओ वर कमेंट करत तिला शुभेच्छा देखील दिल्या आहेत. स्वरू बिचारी विचार करत असेल की, “आई सोबत फिरायला आलेय तरी इथे सुद्धा हिचं कामच सुरू आहे!” अशा अजून काही कमेंट्स प्रेक्षकांनी मधुराणीच्या या व्हिडिओ वर केल्या आहेत.(Madhurani Prabhulkar Australia Trip)