रविवार, जून 7, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

प्रसाद जवादेवर कोसळला दुःखाचा डोंगर, कर्करोगाने आईचे निधन, पत्नी अमृताही भावुक, म्हणाली, “त्यांची आठवण…”

Majja Webdeskby Majja Webdesk
डिसेंबर 29, 2025 | 10:45 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Prasad Jawade Mother Passed Away

अभिनेता प्रसाद जवादेला मातृशोक

Prasad Jawade Mother Passed Away: मराठी मनोरंजनविश्वातून नुकतीच एक दुःखद बातमी समोर आली आहे. ‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘पारू’ या मालिकेतील आदित्यची भूमिका साकारणारा सुप्रसिद्ध अभिनेता प्रसाद जवादे याच्या आईचं निधन झालं आहे. वयाच्या ६५व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रसादची पत्नी अभिनेत्री अमृता देशमुखने त्यांच्या निधनाची बातमी सोशल मीडियाद्वारे दिली. प्रज्ञा जवादे गेल्या काही काळापासून कर्करोगाशी झुंज देत होत्या. अखेर त्यांची ही कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली.

आणखी वाचा: बाबांचं स्वप्न पूर्ण केलं, अकॅडमीत पहिली आले अन् वडिलांचं निधन, ‘कमळी’ फेम अभिनेत्रीने सांगितला भावुक प्रसंग

अमृताने सोशल मीडियावर ही दुःखद बातमी शेअर करत लिहिलं, “कळवण्यास अत्यंत दुःख होत आहे की, प्रसादची आई प्रज्ञा जवादे यांचं २८ डिसेंबर २०२५ रोजी वयाच्या ६५ व्या वर्षी निधन झालं. कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी त्यांनी अपार धैर्य आणि सकारात्मकतेने लढा दिला. त्या अत्यंत प्रेमळ, शांत आणि कुटुंबाला एकत्र ठेवणाऱ्या व्यक्तिमत्त्वाच्या होत्या. त्यांची आठवण सदैव आमच्या हृदयात राहील.” “मम्मी आम्हा सर्वांना तुमची खूप आठवण येत आहे. असं देखील तिने या पोस्टमध्ये लिहिलं.” (Prasad Jawade Mother Passed Away)

दरम्यान काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या ‘झी मराठी’ पुरस्कार सोहळ्यात प्रसादला ‘सर्वोत्कृष्ट मुलगा’ हा पुरस्कार मिळाला होता, तेव्हा त्याच्या आईने आजारपणातही तिथे उपस्थिती लावली होती. यावेळी प्रसादच्या आईला गेल्यावर्षी कॅन्सरचे निदान झाल्याचं समोर आलं. मात्र, या कठीण काळात ही प्रसादने न खचता आईची सेवा आणि मालिकेचं शूटिंग उत्तमरीत्या पार पाडलं होत. दरम्यान आता प्रसाद जवादेला मातृशोक झाला असून संपूर्ण मराठी मनोरंजनविश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे. (Prasad Jawade Mother Passed Away)

आणखी वाचा: “माझ्या डोक्यात हवा गेली होती आणि…”, ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ झाल्यानंतर ‘कमळी’ फेम अभिनेत्रीचं आयुष्यच बदललं; म्हणाली, “आयुष्य सेट झालं असं वाटलं पण…”

Tags: entertainmentmarathi actorprasad jawadePrasad Jawade Mother Passed Away
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
late night eating
Entertainment

रात्री नऊ नंतर जेवताय?, हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो मोठा परिणाम, वाचा सविस्तर

जून 6, 2026 | 12:08 pm
 Tea And Health
Entertainment

चहा पिण्याला कोणतं वय योग्य?, आजारी पडण्याआधी जाणून घ्या सविस्तर…

जून 5, 2026 | 12:10 pm
Does Coffee Cause Dehydration
Entertainment

कॉफी प्यायल्याने Dehydration कमी होते का?, मोठा गैरसमज होणार दूर, वाचा सविस्तर

जून 4, 2026 | 12:00 pm
Next Post
Arshad Warsi And Maria Goretti

मुलगा मुस्लिम आणि बेरोजगारही; सुप्रसिद्ध अभिनेत्याला सासरच्या लोकांनी नाकारलेलं, स्वतःच केला खुलासा, म्हणाला…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.