शनिवार, मे 30, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“हक्काचा माणूस गमावला…”; अजित पवारांच्या निधनानंतर डॉ. अमोल कोल्हेंची दुःखद पोस्ट, म्हणाले, “डोळ्यात अश्रू…”

Majja Webdeskby Majja Webdesk
जानेवारी 28, 2026 | 5:26 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Ajit Pawar Passes Away

अजित पवारांच्या निधनानंतर डॉ. अमोल कोल्हेंची दुःखद पोस्ट

Ajit Pawar Passes Away : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातादरम्यान निधन झाले आहे. अजित पवार हे मुंबईहून बारामती विमानाने प्रवास करत होते. विमान लँडिंग आधी बरामती विमानतळाजवळील एक शेतात कोसळले. यादरम्यान अजित पवार यांचे भीषण अपघातात निधन झाले. तसेच त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. इतकंच नव्हे तर संपूर्ण मराठी मनोरंजनसृष्टीतून अजित पवारांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला जात आहे. तर अजित पवार यांच्या निधनानंतर डॉ. अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली आहे.

आणखी वाचा: अरिजीत सिंगने घेतला रिटायरमेंटचा निर्णय; खरं कारण सांगत केली पोस्ट; म्हणाला, “यामागे एकच कारण नाही…”

अजित पवार यांच्या निधनानंतर डॉ. अमोल कोल्हेंनी पोस्ट करत लिहिलं, “महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, संपूर्ण राज्याचे लाडके आणि हक्काचे दादा मा. अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी निधनाची बातमी अतिशय क्लेशदायक आहे. खरतर अजूनही विश्वास बसत नाही की अजित दादा आता आपल्यात नाहीत. संपूर्ण महाराष्ट्राने आज एक उत्तम प्रशासक, शिस्तशील नेतृत्व आणि जनतेसाठी भल्या पहाटेपासूनच काम करणारा हक्काचा माणूस गमावला आहे. आज फक्त बारामतीकरच नव्हे तर राज्यातील प्रत्येक सर्वसामान्याच्या डोळ्यात अश्रू आहेत आणि सोबतच पोरकेपणाची भावना आहे.” असं लिहीत अमोल कोल्हे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. (Ajit Pawar Passes Away)

View this post on Instagram

A post shared by Dr. Amol Kolhe (@amolrkolhe)

यासोबतच मराठी मनोरंजनसृष्टीतील इतर कलाकारांनी देखील सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेर करत अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सुबोध भावे, मेघ धाडे, सायली संजीव, मंगेश देसाई, हेमंत ढोमे, सूरज चव्हाण, रितेश देशमुख, तेजश्री प्रधान, अंकिता वालावलकर, आदेश बांदेकर, अजिंक्य देव यांसारख्या अनेक कलाकारांनी अजित पवार यांना श्रद्धांजली वाहत दुःख व्यक्त केलं आहे. (Ajit Pawar Passes Away)

आणखी वाचा: “दादा जेव्हा भेटायचे तेव्हा…” निर्माते मंगेश देसाई यांनी सांगितली अजित पवारांची हृदयस्पर्शी आठवण

Tags: Ajit Pawar Deathajit pawar death in plane crashAjit Pawar Passes Awayamol kolhe
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Tumbadchi Manjula Makarand Anaspure
Entertainment

‘तुंबाडची मंजुळा’मधील मकरंद अनासपुरेंचा लूक समोर, अभिनेत्याचा साधू अवतार चर्चेत

मे 30, 2026 | 5:08 pm
Gurmeet Choudhary Debina Bonnerjee
Entertainment

अनेक गर्भपात, सरोगसीद्वारे लेकीचा जन्म…; लग्नाच्या ११ वर्षांनी सुप्रसिद्ध अभिनेत्रीची आई होण्याची धडपड, नवऱ्याकडून खुलासा

मे 30, 2026 | 2:00 pm
Star Pravah Latest News
Entertainment

तीन महिन्यांत आठ नवेकोरे कार्यक्रम; स्टार प्रवाह वाहिनीची मोठी घोषणा, दिग्गज कलाकार झळकणार

मे 30, 2026 | 12:30 pm
 Rekha and Amitabh Bachchan
Entertainment

अभिनेत्यासह संध्याकाळ एकत्र घालवायला सुप्रसिद्ध अभिनेत्रीची भलतीच मागणी, खलनायकाचा खुलासा

मे 30, 2026 | 11:29 am
Next Post
Avadhoot Gupte On Ajit Pawar 

“राष्ट्रवादी लयभारी…", अजित पवारांच्या निधनानंतर अवधूत गुप्तेची डोळ्यांत पाणी आणणारी पोस्ट, म्हणाला, "आपलं बोलणं शेवटंच…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.