शुक्रवार, मे 9, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

04 January Horoscope : सिद्धी योगाचा शुभ योगामुळे मकर राशीसह ‘या’ राशींना होणार आर्थिक फायदा, जाणून घ्या…

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 3, 2025 | 8:00 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
04 january 2025 Saturday daily horoscope Know the financial benefits of special signs including Capricorn due to the auspicious yoga of Siddhi Yoga

चला जाणून घेऊया शनिवारचा दिवस इतर सर्व राशींसाठी कसा असेल आणि तुमच्या नशिबात नक्की काय असेल?

04 January Horoscope : ०४ जानेवारी २०२४, शनिवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार मिथुन राशीच्या लोकांसाठी शनिवारचा दिवस चांगला राहील. व्यवसायाशी संबंधित लोकांना मोठा फायदा होऊ शकतो. आर्थिक स्थिती चांगली राहील. सिंह राशीच्या लोकांसाठी शनिवारचा दिवस त्रासदायक असणार आहे. चला जाणून घेऊया शनिवारचा दिवस इतर सर्व राशींसाठी कसा असेल आणि तुमच्या नशिबात नक्की काय असेल? (04 January Horoscope)

मेष  (Aries) : मेष राशीच्या लोकांसाठी शनिवारचा दिवस शुभ असणार आहे. मित्रांसोबत नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी शनिवारचा दिवस खूप चांगला जाण्याची शक्यता आहे. नोकरदार लोकांसाठी दिवस चांगला जाणार असून आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे.

वृषभ (Taurus) :  वृषभ राशीच्या लोकांसाठी शनिवारचा दिवस संमिश्र राहील. कामाच्या ठिकाणी यश मिळण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी तुमचे सहकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील. कामाच्या ठिकाणीही प्रगती होण्याची शक्यता आहे. तुम्हाला सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल.

मिथुन (Gemini) :  मिथुन राशीच्या लोकांसाठी शनिवारचा दिवस खूप खास असणार आहे. कोणतीही मालमत्ता, घर, दुकान इत्यादी गुंतवणुकीसाठी आजचा दिवस चांगला आहे. गुंतवणुकीतून तुम्हाला भविष्यात भरपूर नफा मिळण्याची शक्यता आहे. घरात कुटुंबियांसोबत चांगला वेळ घालवाल. तुमचा तुमच्या जोडीदाराशी काही मुद्द्यावर वाद होण्याची शक्यता आहे.

कर्क (Cancer) :  कर्क राशीच्या लोकांसाठी शनिवारचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. मुलांकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी शनिवारचा दिवस चांगला आहे, व्यवसायात वाढ होईल. अनेक दिवसांपासून सुरू असलेला वाद संपुष्टात येऊ शकतो.

सिंह (Leo) :  सिंह राशीच्या लोकांसाठी शनिवारचा दिवस चांगला राहील. व्यवसायात नवीन प्रकल्प मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे आर्थिक परिस्थितीत लक्षणीय सुधारणा होईल. सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांसाठी शनिवारचा दिवस चांगला आहे. धार्मिक कार्यात मुलांची आवड वाढेल. तुम्ही कुटुंबासोबत वेळ घालवाल.

कन्या (Virgo) :  कन्या राशीच्या लोकांसाठी शनिवारचा दिवस शुभ राहील. नोकरीच्या ठिकाणी यश मिळेल. तुमचे कामाचे सहकारी तुम्हाला साथ देतील आणि तुमच्या कामावर आनंदी राहतील. तुमच्या प्रगतीचीही शक्यता आहे. सामाजिक कार्यक्रमात मानसन्मान मिळेल. कुटुंबासमवेत वेळ घालवण्याचा प्रयत्न करा.

तूळ (Libra) :  तूळ राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला जाईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत उपलब्ध होतील. लग्नाची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. छोट्या व्यावसायिकांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल. मुलांकडून निराशा होऊ शकते.

आणखी वाचा – अक्षरा आई होणार असल्याचं सत्य भुवनेश्वरीला समजणार, अधिपतीशी बोलण्यासाठी धडपड, एकत्र कधी येणार?

वृश्चिक (Scorpio) : वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शनिवारचा दिवस चांगला जाईल. नोकरदारांना नोकरीच्या ठिकाणी यश मिळेल. परंतु कार्यालयात कोणत्याही वादात पडणे टाळा. घरी आणि कामाच्या ठिकाणी समन्वय निर्माण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. जबाबदारी चोख पार पाडाल. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी परदेशात जाण्याची शक्यता आहे.

धनु (Sagittarius) :  धनु राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र जाईल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना जास्त मेहनत करावी लागू शकते. आर्थिक लाभ होईल. मुलांकडून काही चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या मुलांच्या भवितव्याची तुमची चिंता संपुष्टात येईल. कुटुंबासमवेत एखाद्या कार्यक्रमात सहभागी होता येईल. परदेश दौऱ्यावर जाण्याचीही शक्यता आहे.

मकर (Capricorn) : मकर राशीच्या लोकांसाठी शनिवारचा दिवस शुभ असणार आहे. मित्रांसोबत नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी दिवस चांगला आहे. कौटुंबिक सुखात वाढ होईल. नोकरदारांसाठी दिवस चांगला जाणार आहे. आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. कोणत्याही चुकीच्या व्यक्तीच्या बोलण्याने प्रभावित होऊन कोणताही निर्णय घेऊ नका.

आणखी वाचा – “लग्नाला १२ वर्षे झाली आहेत तरी…”, हेमंतचं क्षिती जोगबरोबरच्या नात्याबद्दल भाष्य, म्हणाला, “एकमेकांकडून अपेक्षा…”

कुंभ (Aquarius) : कुंभ राशीच्या लोकांसाठी शनिवारचा दिवस सकारात्मक राहील. मन शांत ठेवण्याची गरज आहे. कोणाशीही बोलत असताना बोलण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. घरातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील.

मीन (Pisces) :  मीन राशीच्या लोकांसाठी शनिवारचा दिवस संमिश्र राहील. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. तुम्हाला कुटुंबातील सदस्याकडून आर्थिक मदत मिळू शकते. व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी दिवस चांगला जाणार आहे. नवीन प्रकल्प सुरू करण्यापूर्वी वरिष्ठांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरू शकते.

Tags: 04 January Horoscopemonthly horoscope 2025monthly horoscope january 2025
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Akshay Kelkar Wedding
Entertainment

शुभमंगल सावधान! ‘बिग बॉस’ फेम सुप्रसिद्ध अभिनेता अडकला लग्नबंधनात, लग्नातील पहिला फोटो समोर

मे 9, 2025 | 6:08 pm
Aly Goni Viral Post
Entertainment

“जम्मूमध्ये माझं कुटुंब हल्ले सहन करतायत”, भारत-पाकमधील वाढत्या तणावामुळे प्रसिद्ध अभिनेता काळजीत, सांगितली सत्य परिस्थिती…

मे 9, 2025 | 5:35 pm
Pakistani Person Viral Video
Social

“त्यांना न्याय मिळाला”, पाकिस्तानी नागरिकाकडून भारतीय सैन्याचे कौतुक, पाक सैन्याला खडेबोल सुनावत…

मे 9, 2025 | 4:08 pm
Neha Kakkar Attends Driver Wedding 
Entertainment

नेहा कक्करची ड्रायव्हरच्या लग्नात उपस्थिती, नवरी मुलगी नमस्कार करण्यास खाली वाकताच घेतलं जवळ, गायिकेच्या कृतीने जिंकलं मन

मे 9, 2025 | 1:03 pm
Next Post
Pushpa 2 fame actor Allu Arjun bail granted by the talangana high court in Sandhya theater stampede case

अल्लू अर्जुनला कोर्टाकडून मोठा दिलासा, संध्या थिएटर चेंगराचेंगरीप्रकरणी अभिनेत्याला जामीन

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.