मराठीतील आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळी ही एका कारणाने सध्या चांगलीच चर्चेत आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेतल्यानंतर आता सिने क्षेत्रातील कलाकार मंडळी तिच्या पाठिशी उभी राहिली आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत लोकप्रतिनिधींनी महिलांना टार्गेट केल्याप्रकरणी संताप व्यक्त केला आहे. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची राज्यभरात चर्चा सुरू आहे. या प्रकरणाविषयी बोलताना भाजप आमदार सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीसह अनेक अभिनेत्रींचा उल्लेख केला. (Gashmeer Mahajani On Prajakta Mali)
यानंतर संतापलेल्या प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेत घडलेल्या घटनेचा खेद व्यक्त केला. तसंच आणि सुरेश धस यांनी माफी मागावी अशी मागणी केली. त्यांनी या प्रकरणात महिला आयोगाकडे तक्रार केल्याचंही सांगितलं जात आहे. प्रकरणानंतर मराठी कलाकार प्राजक्ताच्या समर्थनार्थ पुढे आले. त्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत प्राजक्ताला पाठिंबा दिला. अभिनेता कुशल बद्रिके, अभिनेत्री विशाखा सुभेदार, लेखक-दिग्दर्शक सचिन गोस्वामी, तसंच निर्माते नितीन वैद्य यांनी प्राजक्तासाठी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत जाहीर पाठिंबा दिला. अशातच अभिनेता गश्मीर महाजनीनेही या प्रकरणावर त्याची प्रतिक्रिया दिली आहे.

गश्मीर महाजनी हा सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतो. सोशल मीडियावर आपले अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. अशातच त्याने नुकतंच इन्स्टाग्रामवर प्रश्नोत्तरांचं सेशन केलं. यात त्याला एका चाहत्याने प्राजक्ता माळीबद्दल प्रश्न विचारला. यावेळी गश्मीरने हे संपुर्ण प्रकरण माहीत नाही. कारण मी चित्रपटाचे शुटिंग करण्यात व्यस्त असल्याचे म्हटलं. यावेळी चाहत्याने गश्मीरला “प्राजक्ताच्या समर्थनार्थ काही?” असा प्रश्न विचारला.
आणखी वाचा – 30 December Horoscope : सोमवारी तुमच्या सर्व इच्छा-मनोकामना पूर्ण होणार, प्रगतीच्या संधी, जाणून घ्या…
ज्याचे उत्तर देत गश्मीर असं म्हणाला की, “मला हे संपूर्ण प्रकरण काय आहे हे माहित नाही. कारण, मी सध्या चित्रपट बनवण्यात व्यस्त आहे. पण मला एवढंच माहीत आहे की, प्राजक्ता एक खंबीर, स्वतंत्र आणि सशक्त स्त्री आहे आणि त्यासाठी मी तिचा खूप आदर करतो”. दरम्यान, गश्मीर व प्राजक्ताने नुकताच ‘फुलवंती’ हा चित्रपट केला. त्यांच्या या चित्रपटाला चांगलेच यश मिळाले. या चित्रपटातील प्राजक्ता-गश्मीरयांची जोडीही प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती.