रविवार, मे 11, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मला बाई फार आवडला नाही”- ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाबद्दल विजू मानेंची पोस्ट चर्चेत

Darshana Shingadeby Darshana Shingade
जुलै 18, 2023 | 3:14 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Viju Mane On Baipan Bhari Deva

Viju Mane On Baipan Bhari Deva

अनेक हिंदी चित्रपट रांगेत उभे असताना जेव्हा एक मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर वेगळीच हवा करतो.तेव्हा प्रत्येक मराठी कलाकार भरून पावतो. ‘सैराट’ आणि ‘वेड’ नंतर असाच नवीन विक्रम केलेला चित्रपट म्हणजे ‘बाईपण भारी देवा’ केदार शिंदे यांचं दिग्दर्शन असलेला आणि मराठी सिनेसृष्टीतील ६ गुणी अभिनेत्रींनी घडवलेला असा हा चित्रपट आहे.चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. मोठया संख्येने स्त्रिया चित्रपटगृहांमध्ये गर्दी करत आहेत.५० कोटी इतकी कमाई करून चित्रपटाने नवा विक्रम तयार केला आहे.अजूनही प्रेक्षक त्याच उत्साहाने चित्रपट बघत आहेत. अनेक कलाकारांनी चित्रपटाला शुभेच्छा दिल्या, चित्रपटाचं कौतुक केलं.अशीच एक प्रतिक्रिया सध्या चर्चेत आहे.(viju mane on baipan bhari deva)

पाहा काय म्हणाले विजू माने? (viju mane on baipan bhari deva)

दिग्दर्शक विजू माने यांनी ‘बाई पण भारी देवा’ या चित्रपटनिमित्त एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टच्या कॅप्शन मध्ये त्यांनी म्हंटल आहे,मराठी चित्रपट रसिक प्रेक्षकहो तुमचे मनापासून आभार… सध्या तिकीट बारी वर “बाई पण भारी देवा” हा ‘भारीच’ जमून आलेला सिनेमा ‘भारी’ गर्दी जमवतो आहे. ज्याचा मला एक मराठी चित्रपटकर्ता म्हणून अभिमान आहेच. त्याबद्दल केदार शिंदे आणि त्याच्या टीमचं विशेषतः लेडीज ब्रिगेडचं मनापासून अभिनंदन. रसिक प्रेक्षकांना दूषणं देऊन काहीही होत नाही. ‘उत्तम सिनेमा’ हा एकमेव यशाचा मार्ग आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. मराठी लोक मराठी सिनेमांना गर्दी करत नाहीत याची कारणे मराठी सिने निर्माते आणि दिग्दर्शक यांनी शोधली आणि त्या बरहुकूम सिनेमे बनवले तर लोक गर्दी करतात हे आता दिसून आलं आहे. आत्ताच्या अंदाजानुसार तिकीट बारी वरील सर्वाधिक कमाईचा विक्रम सिनेमा करण्याची शक्यता आहे.

मला याबाबतीत जिओचे निखिल साने यांचं कौतुक वाटतं. उगाचच कुणाच्यातरी पदरी देव अमाप यश टाकत नसतो. त्यामागे त्या व्यक्तीचा संशोधन, अनुभव आणि योग्य वेळ साधून करावयाच्या गोष्टी याचं कौशल्य अशा अनेक गोष्टी कारणीभूत असतात.सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही मार्केटच्या स्वभावानुसार आता पुन्हा एकदा स्त्रियांवर आधारित सिनेमांची लाट येऊ शकेल. त्यात काही वावगं आहे असं मी म्हणणार नाही. कारण जे खपतं ते विकावं हा एक सामान्य बुद्धी असलेल्या व्यावसायिकाचा आडाखा असणारच. मुळात सिनेमा बनवताना कोणीही ‘चला आज वाईट सिनेमा बनवूया’ असं म्हणून सिनेमा बनवत नाही.

Viju Mane On Baipan Bhari Deva

हे देखील वाचा : कोण आहे रवींद्र महाजनी यांची लेक? गश्मीरने शेअर केलेली पोस्ट चर्चेत

पण चांगला सिनेमा बनवण्यासाठी केवळ ‘मला ही गोष्ट फार आवडली, म्हणून मी हा सिनेमा केला’ असे निर्माते नकोत. इतर व्यवसायांनी जसं सर्वे, प्रवाह आणि नेमका टार्गेट ऑडियन्स असा अभ्यास करून मग आपले प्रॉडक्ट बाजारात विकण्यासाठी आणण्याची वाट निवडली हीच पद्धत आता मराठी सिनेमांनी उत्तरोत्तर स्वीकारायला हवी. आणि मराठी प्रेक्षकांना पुन्हा एकदा थेटर मध्ये टाळ्या शिट्ट्या नाच करत सिनेमा एन्जॉय करण्याची ‘सवय’ लावायला हवी. आता यातही ‘प्रेक्षकानुनय केलेला सिनेमा’ ‘त्यात काय एवढं?’ ‘मला बाई फार नाही आवडला’ ‘आशयघनता कुठे आहे?’ “सिनेमात डेप्थ नाही’ अशा प्रकारच्या प्रतिक्रिया असतील, त्या असणारच.But nothing succeeds like success.’बाई पण भारी देवा’ च्या सगळ्या टीमला आणि त्या टीमला यश देणाऱ्या अख्या जगभरच्या रसिक प्रेक्षकांना मला मनापासून धन्यवाद द्यायचे आहेत. मराठी चित्रपटांच्या नावानं चांगभलं. (viju mane on baipan bhari deva)

Tags: baipan bhari devaviju maneviju mane on baipan bhari deva
Darshana Shingade

Darshana Shingade

Latest Post

Kitchen Hacks
Lifestyle

Kitchen Tips : जेवण बनवताना खूपच तारांबळ होते?, मधुराच्या ‘या’ सोप्या टिप्स ठरतील फायदेशीर

मे 11, 2025 | 5:00 pm
Marathi actor chetan dalvi journey
Entertainment

ब्रेनस्ट्रोक, इंडस्ट्रीला विसर अन्…; मराठी सुप्रसिद्ध अभिनेत्याचा सगळ्यात वाईट काळ, आता दिसतात असे

मे 11, 2025 | 1:00 pm
Mumbai Shocking News
Women

अश्लील व्हिडीओ दाखवून आठ वर्षाच्या मुलीचे कपडे काढणारा ‘तो’ जिवंत राक्षस

मे 11, 2025 | 10:00 am
Hina Khan Received Threats
Entertainment

धर्म, पाकिस्तान अन् त्रास; मुस्लिम म्हणून हिना खानला थेट धमक्या, म्हणाली, “सीमेपलीकडील लोकांवरही प्रेम केलं पण…”

मे 10, 2025 | 6:17 pm
Next Post
ankush chaudhari share his singing on zindagi zindagi

फक्त एक ओळ माझी सुरात आली, अंकुशने सांगितला दुनियादारीमधील 'या' गाण्यामागचा किस्सा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.