आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या दिवंगत अभिनेत्री मीना कुमारी यांचं हिंदी सिनेसृष्टीत मोठं योगदान आहे. त्यांनी अनेक हिंदी सिनेमे दिले असून देश-विदेशातही त्यांचा मोठा चाहतावर्ग होता. त्यांच्या भारतीय सिनेसृष्टीतील योगदानामुळेच त्यांना ‘ट्रॅजेडी क्वीन’ अशी ओळख त्याकाळात मिळाली होती. अश्या या सदाबहार अभिनेत्रींच्या आयुष्यावर आधारित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (meena kumari biopic)
मीना कुमारी यांनी लहानपणीच सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. ‘पिया घर आजा’, ‘श्री गणेश महिमा’, ‘परिणीता’ आणि ‘बैजू बावरा’ अशा सुपरहिट सिनेमांच्या माध्यमातून मीना कुमारी घराघरांत पोहोचल्या. त्याचबरोबर मीना कुमारी वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत आल्या होत्या. त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर झाला होता आणि 31 मार्च 1972 रोजी त्यांचे निधन झाले.(meena kumari)

अश्या या अभिनेत्रीच्या आयुष्यावर लवकरच सिनेमा येणार असून मीडिया रिपोर्ट्सनुसार अभिनेत्री क्रिती सेनन ही मीना कुमारीच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा सांभाळणार असून याच सिनेमाच्या माध्यमातून मनीष दिग्दर्शनात पदार्पण करणार आहे. तर टी-सीरिज या सिनेमाची निर्मिती करणार आहे. सध्या सिनेमाच्या संहितेवर काम सुरू असून लवकरच शूटिंगला सुरुवात होणार आहे.
फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा गेल्या अनेक वर्षांपासून सेलेब्रिटींचे कॉस्च्युम्स डिझाइन करत असून त्याच्या कॉस्च्युम्सची अनेकदा चर्चा होते. तर अभिनेत्री क्रिती सेनन ‘आदिपुरुष’ या सिनेमात दिसली होती. पण सिनेमा बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरल्याबरोबरच चांगलाच वादात अडकला होता. सध्या तिच्याकडे अन्य प्रोजेक्ट्स असून क्रितीला पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. (kriti sanon manish malhotra)
हे देखील वाचा : सलग फ्लॉप चित्रपट केल्यामुळे ‘OMG २’ मध्ये अक्षय कुमारने केली मानधनात घट