Urfi Javed Troll : उस्ताद झाकीर हुसेन आता आपल्यात नाहीत. सोमवारी सकाळी सॅन फ्रान्सिस्कोच्या रुग्णालयात त्यांचे निधन झाले. वयाच्या ७३ व्या वर्षी उस्ताद यांच्या निधनामुळे जगभरातील त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला असतानाच, बॉलिवूडपासून राजकीय घराण्यापर्यंत सर्वांनाच दुःख झाले आहे. पण या सगळ्यामध्ये उर्फी जावेदचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिने प्रसिद्ध तबला वादकाच्या मृत्यूवर विचित्र प्रतिक्रिया दिली आहे. उर्फीने सांगितले की झाकीर हुसेन कोण आहेत हे मला माहित नाही. उर्फी जावेद नेहमीप्रमाणे फोटो काढण्यासाठी सोमवारी संध्याकाळी मुंबईला पोहोचली होती. यावेळी ती तिच्या अनोख्या ड्रॅगन ड्रेसचे प्रदर्शन करत होती.
उर्फीला पाहिल्यानंतर तेथे उपस्थित पापाराझी नेहमीप्रमाणे फोटो काढण्यात व्यस्त असताना, त्यांनी चार ग्रॅमी पुरस्कार जिंकलेल्या पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांच्या निधनाबद्दल उर्फीला त्यांची प्रतिक्रिया देखील विचारली. पापाराझीने उर्फीला विचारले, “झाकीर हुसेन सर तुम्ही ओळखता का?”. यावर अभिनेत्रीने मान हलवली आणि ‘नाही’ असे उत्तर दिले. एक इशारा देत पापाराझी पुढे म्हणाले, ते एक महान गायक आहेत, ते एक संगीतकार आहेत. यावर उर्फीने चेहरा करुन तिला माहित नसल्याचे संकेत दिले. त्यानंतर ती घटनास्थळी उपस्थित असलेल्या तिच्या टीमशी बोलण्यात व्यस्त झाली आणि पापराजींच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले.
आणखी वाचा – “मी तुझीच आहे आणि…”, नवऱ्याच्या वाढदिवसाला जिनिलीया देशमुखची रोमँटिक पोस्ट, शेअर केले Unseen Photos
उर्फीच्या या प्रतिक्रियेने उस्ताद झाकीर हुसैन यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. एका यूजरने सोशल मीडियावर लिहिले की, “हे चुकीचे आहे. निदान दिग्गज लोकांची माहिती तरी असावी”. तर दुसऱ्याने लिहिले, “उर्फी लखनऊची आहे. तिथूनच तिने शिक्षण घेतले आहे. त्यामुळे तिला इतकी माहिती असायला हवी होती”. कुटुंबीयांच्या मते, उस्ताद झाकीर हुसेन इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिसने ग्रस्त होते. गेल्या दोन आठवड्यांपासून त्यांना सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले, जिथे त्यांनी सोमवारी, १६ डिसेंबर रोजी सकाळी अखेरचा श्वास घेतला.
आणखी वाचा – शिवानी सोनारची लगीनघाई सुरु, पारंपरिक दागिना घडवण्यासाठी गाठलं सोनाराचं दुकान, साधेपणाचं कौतुक
झाकीर हुसेन यांना प्रतिष्ठेच्या ग्रॅमी पुरस्कारासाठी एकूण सात वेळा नामांकन मिळाले होते. यापैकी त्याने चार वेळा ग्रॅमी जिंकले होते. त्यांच्या वडिलांचे नाव उस्ताद अल्लाह राखा कुरेशी असून ते देखील प्रसिद्ध तबलावादक होते. त्यांच्या आईचे नाव बीवी बेगम होते. मुंबईतील माहीम येथील सेंट मायकल स्कूलमध्ये शिकलेल्या झाकीर हुसेन यांनी शहरातील सेंट झेवियर्स कॉलेजमधून पदवीचे शिक्षण घेतले. जेव्हा त्यांनी अमेरिकेत पहिला कॉन्सर्ट केला तेव्हा ते फक्त ११ वर्षांचे होते.