मंडळी आपण नेहमीच आपल्या कलाकाराबद्दल अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी उत्सुक असतो. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक असे कलाकार आहेत ज्यांचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. आणि हे कलाकार नेहमी काही ना काही कारणांनी चर्चेत असतात. सध्या अशीच एक चर्चा सुरु आहे ती म्हणजे आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा अभिनेता सोहम बांदेकर बाबत. सध्या सोशल मीडियावर सोहमचा आणि एका मुलीचा फोटो व्हायरल होतोय आणि बांदेकर कुटुंबाची सून आहे का अशा हि चर्चा चाहत्यांमध्ये रंगल्या आहेत.(soham bandekar viral photo)
या बाबत स्वतः सोहमने स्पष्टीकरण दिलं आहे. सध्या सर्वत्र चर्चेत असलेला चित्रपट म्हणजे बाईपण भारी देवा या चित्रपटात अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांच्या सोबत सोहमने ही पाहुण्या कलाकाराची भूमिका निभावली आहे. या चित्रपटात तो एका फॉरेनर मुली सोबत व्हिडिओ कॉल वर बोलतानाचा फोटो सध्या व्हायरल होतोय. आणि याच फोटोंवर एका चाहत्याने स्टोरी पोस्ट करत “दादा तुमचे दर्शन आणि वहिनींना नमस्कार” अशी कमेंट केली आहे.

सोहमने चाहत्याची ही स्टोरी रिपोस्ट करत लिहिलंय “माझ्यापेक्षा जास्त ही कोण आहे हेच सगळ्यांना महत्वाचं वाटतय आजकाल”.
पुढे आणखी स्पष्टीकरण देत सोहम म्हणतोय “मी ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली. केदार शिंदे काका यासाठी धन्यवाद. मी तुमचा गोंधळ समजू शकतो.”
सोहमचं स्पष्टीकरण (soham bandekar wife)
विशेष म्हणजे चित्रपटात माझ्याबरोबर जी मुलगी होती, त्या मुलीला मी खरंच ओळखत नाही. आई तर यावरुन माझ्यावर अजिबात चिडलेली नाही. सर्वांचे विशेष आभार आणि प्रेम. ज्यांनी ज्यांनी मला मेहनत घेऊन या सीनचे फोटो काढून पाठवले”, असे सोहमने इन्स्टाग्राम स्टोरीवर फोटो पोस्ट करत स्पष्टीकरण दिलं आहे.(soham bandekar)
हे देखील वाचा – आदेशने विवाहबाह्य संबंध ठेवले तर
बाईपण भारी देवा हा चित्रपट सध्या सर्वत्र धुमाकूळ घालताना दिसतोय आणि या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराचं प्रेक्षकांकडून चांगलंच कौतुक देखील केलं जातंय. तर सोहम प्रमाणे काही कलाकारांना प्रेक्षकांच्या अशा मजेशीर प्रश्नांना देखील सामोरं जावं लागतंय.