कोरोनानंतर मराठी सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर गल्ला जमवायला सुरुवात केली आहे. वेड या चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर आता बाईपण भारी देवा या चित्रपटाने मराठी सिनेसृष्टीला हादरवून सोडलं आहे. आतापर्यंत तब्बल १२ कोटींहून अधिक कमाई केलेला हा चित्रपट सलग दुसऱ्या आठवड्यातही चित्रपटगृहांमध्ये तग धरून आहे. दिग्दर्शक केदार शिंदे दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेता रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर, दीपा परब या मुख्य भूमिकेत झळकल्या. (Suchitra Bandekar Aadesh Bandekar)
बॉक्स ऑफिसवर झळकलेल्या या कलाकारांचे सगळीकडे तोंडभरून कौतुक होताना दिसतंय. समस्त महिलावर्गाने हा चित्रपट डोक्यावर उचलून धरला आहे. स्त्रीचे महत्व पटवून सांगणाऱ्या या चित्रपटाची अनोखी कथा सगळ्यांना भावुक करणारी आहे. चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर चित्रपटातील कलाकारांनी पुन्हा एकत्र येत हा आनंद सोहळा साजरा केला. दरम्यान इट्स मज्जाला दिलेल्या मुलाखतीत सुचित्रा बांदेकर यांनी केलेलं भाष्य लक्षवेधी आहे.
पाहा आदेश बांदेकर पत्नीसाठी काय म्हणाले (Suchitra Bandekar Aadesh Bandekar)
सुचित्रा बांदेकर यांनी आजवर अनेक चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची झलक दाखवली. बाईपण भारी देवा मुळे सुचित्रा बांदेकर सध्या अधिक चर्चेत असलेल्या पाहायला मिळत आहेत. इट्स मज्जाला दिलेल्या मुलाखतीत त्यांना एखाद्या पुरुषाकडून आलेली प्रतिक्रिया आठवतेय का असा प्रश्न विचारला असता, सुचित्रा काय म्हणाल्या चला पाहुयात.(Aadesh Bandekar Reacts)
यावरून एकंदर आदेश बांदेकर यांना सुचित्रा बांदेकर यांनी साकारलेली चित्रपटातील भूमिका विशेष आवडली. आदेश बांदेकर यांचं संपूर्ण कुटुंब सिनेमाविश्वात कार्यरत आहे. महाराष्ट्राचे लाडके भावोजी म्हणून त्यांच्यावर समस्त महिलावर्ग प्रेम करतातच आता त्यांच्या पत्नी सुचित्रा बांदेकर यांना देखील चाहत्यांचं भरभरून प्रेम मिळताना दिसतंय. बाईपण भारी देवा या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेमुळे त्यांना विशेष लोकप्रियता मिळाली आहे. याशिवाय चित्रपटातील इतर कलाकारांच्या भूमिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहेत.
