छोट्या पडद्यावरून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री तेजश्री प्रधान हीने तिच्या अभिनय कौशल्याने रुपेरी पडद्यावर स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. घराघरातील लाडकी अभिनेत्री म्हणून आजही चाहते तिच्यावर भरभरून प्रेम करत आहेत. सोशल मीडियावरही तेजश्री बऱ्यापैकी सक्रिय असते. तिची सोशल मीडियावरील प्रत्येक पोस्ट चर्चेत असते. सध्या तेजश्री छोट्या पडद्यापासून दूर असली तरी ती सोशल मीडियावरून चाहत्यांसोबत नेहमीच संपर्कात राहत असते. तिच्या अभिनय शैलीमुळे तिचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. ती तिच्या फोटो, व्हिडिओद्वारे चाहत्यांशी संपर्कात राहते. (Tejashri Shivani Photo)
अशातच तेजश्री पावसाळ्यात निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी ट्रेकला गेल्याच समोर आलं आहे. याआधीही तेजश्रीने ट्रेकला गेल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावरून शेअर केला होता. आता पुन्हा एकदा पावसाळ्याच्या मनमुराद आनंद घ्यायला तेजश्री ट्रेकला गेली होती. यावेळी तेजश्री सोबत कलाविश्वात आणखी एक अभिनेत्री गेली होती. दोघीनींही ट्रेकचे अनेक फोटोस सोशल मीडियावरून पोस्ट केले आहेत. मात्र या दन अभिनेत्रींना पहिल्यांदा एकत्र आलेलं पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.
पाहा तेजश्री आणि शिवानी नेमकं कुठे गेले होते एकत्र (Tejashri Shivani Photo)
‘होणार सून मी या घरची’ फेम अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि ‘लागिरं झालं जी’ आणि ‘लवंगी मिरची’ फेम अभिनेत्री शिवानी बावकर पावसाळी ट्रेकला एकत्र गेल्या होत्या. ट्रेकसाठी दोघींनीही मुंबईपासून ८० किलोमीटरवर कर्जतजवळ असलेल्या ‘गारबेट पॉईंट’ची निवड केली होती. ‘गारबेट पॉईंट’ ट्रेक जवळपास दोन तासांचा आहे. तेजश्री प्रधानने या संपूर्ण ट्रेकचा वेगळा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Tejashri Shivani Trekking Diary)
तेजश्रीने शिवानी बावकरबरोबर ट्रेकचे फोटो शेअर करत “मी माझ्या लाडक्या मैत्रिणीबरोबर जंगलात फिरतेय…” असं कॅप्शन दिले आहे. दोघींच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने, “तुम्ही दोघी मैत्रिणी कधी झालात…कळलच नाही” अशी कमेंट केली आहे.