शुक्रवार, मे 9, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

बजरंगच्या मदतीने अक्षरा समोर आणणार सासूचं सत्य, भुवनेश्वरीचा पर्दाफाश होणार?, अधिपती कुणाची बाजू घेणार?

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 9, 2024 | 3:51 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Tula Shikvin Changlach Dhada serial update Akshara will bring out the truth about mother-in-law Bhunaveshwari's lies with the help of Bajrang

बजरंगच्या मदतीने अक्षरा भूनवेश्वरीच्या खोटेपणाचे सत्य समोर आणणार, अधिपतीची साथ नक्की कुणाला?

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेच्या कथानकात सध्या भुवनेश्वरीचं सत्य सूर्यवंशी कुटुंबीयांसमोर उघड झाल्याचा पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून भुवनेश्वरी चारुलताच्या रुपात सूर्यवंशी कुटुंबात राहत असते आणि अक्षराला वेडं ठरवण्याचा प्रयत्न करते. पण, ऐनवेळी अक्षरा तिची चोरी पकडते आणि भुवनेश्वरी-चारुहासच्या लग्नाचा डाव उधळून लावते. अक्षरावर सुरुवातीला कोणीही विश्वास ठेवण्यास तयार नसतं. पण, हळुहळू मास्तरीण बाई बजरंग विरोधात मोठा पुरावा गोळा करते. त्याच्याकडून हुशारीने सत्य वदवून घेत, अक्षरा हे रेकॉर्डिंग भर लग्नात लावते. यामुळे चारुहास भुवनेश्वरीवर भयंकर संतापतो आणि लग्न मोडतो. (Tula Shikvin Changlach Dhada serial update)

मात्र अधिपती त्याच्या आईची बाजू घेत सगळ्या प्लॅनची आधीच कल्पना असल्याचं मान्य करतो. यामुळे अक्षराला मोठा धक्का बसतो. अधिपतीने विश्वासघात केल्याची भावना तिच्या मनात निर्माण होते. पण, या सगळ्यातून हार न मानता भुवनेश्वरीचा खोटा चेहरा सर्वांसमोर उघड करायचा असं अक्षरा ठरवते. अशातच आता मालिकेत एक मोठा ट्विस्ट आला आहे, तो म्हणजे अक्षरा बजरंगच्या मदतीने भुवनेश्वरीचा डाव उधळून लावणार आहे. याचा एक प्रोमो नुकताच शेअर करण्यात आला आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – “दादांनी माझ्या घराचे काम सुरु केले आणि…”, अजित पवारांना भेटायला मुंबईत आला सूरज चव्हाण, म्हणाला, “देवमाणूस…”

या नवीन प्रोमोमध्ये अक्षरा असं म्हणते की, “यांनी (भुवनेश्वरी) जे काही केलं आहे त्याला अजिबातच क्षमा नाही. म्हणून मी बाबांना शब्द दिला आहे. मी हा विषय अर्ध्यावरच सोडून देणार नाही”. यावर भुवनेश्वरी तिला असं म्हणते की, “आता नक्की काय विषय आहे तुमचा?”. यावर अक्षरा असं म्हणते की, “सत्य…”  आणि यावर भुवनेश्वरी असं म्हणते की, “कसलं सत्य?” इतक्यात तिथे बजरंगला आणले जाते. याआधी बजरंगने अक्षराला भुवनेश्वरीचं सत्य सांगणार असल्याचे कबूल केलं होतं..

आणखी वाचा – “मला तिच्या रुपात मुलगीच झाली अन्…”, मृणाल कुलकर्णींनी सांगितलं सूनेबरोबरचं नातं, म्हणाल्या, “देवाने थेट…”

त्यामुळे आता अक्षराच्या म्हणण्यानुसार खरंच बजरंग सत्य सांगणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. प्रोमोमधील बजरंगच्या चेहऱ्यावरुन तरी तो पुन्हा पलटी मारणार असल्याचे वाटत आहे. पण नेमकं काय होतं ही आगामी भागात पाहायला मिळेल. तसंच या सगळ्यात अधिपती पुन्हा एकदा आपल्या आईची साथ देणार की बायकोची? हे पाहणेदेखील महत्त्वाचे ठरणार आहे    

Tags: tula shikvin changlach dhadatula shikvin changlach dhada today episode
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

soldier duty over marriage
Social

हळद फिटली नसतानाही जवान लग्नाच्या तिसऱ्या दिवशी कामावर रुजू, आई-वडील भावुक तर पत्नीचा खंबीर पाठिंबा, मन हेलावणारा व्हिडीओ

मे 9, 2025 | 11:22 am
Akshay Kelkar Haldi Ceremony
Entertainment

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याला लागली हळद, घरीच कुटुंबियांसह सेलिब्रेशन, मराठी कलाकारांची हजेरी

मे 9, 2025 | 10:56 am
Which Cooking Oil Is Good
Lifestyle

‘या’ तेलामुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण अधिकाधिक वाढतंय, जेवणात कोणतं तेल वापरणं अधिक उत्तम?, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार…

मे 8, 2025 | 7:00 pm
Video Viral From Pakistan
Social

“आम्ही भारताला थांबवूच शकलो नाही आणि…”, पाकिस्तान नागरिकाकडूनच भारताचा जयजयकार, पाक सैन्याचं सत्य समोर आणत…

मे 8, 2025 | 4:00 pm
Next Post
uorfi javed viral video

उर्फी जावेदचा कहर, साडीच्या पदराने झाकलं शरीर, व्हिडीओ समोर येताच जान्हवी कपूरशीही तुलना कारण…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.