दाक्षिणात्य सुपरस्टारच्या नागार्जुन यांचा थोरला लेक म्हणजेच अभिनेता नागा चैतन्यने नुकतीच लग्नगाठ बांधली. हे लग्न हैदराबादच्या अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये मोठ्या थाटामाटात पार पडलं. ४ डिसेंबर रोजी रात्री हैदराबाद याठिकाणी असणाऱ्या अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये एका खाजगी समारंभात लग्नगाठ बांधली आहे. यावेळी संपूर्ण अक्किनेनी कुटुंब आणि मित्रपरिवार उपस्थित होते. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. (naga chaitanya and sobhita dhulipala weeding unseen photo)
अशातच रविवारी दोघांनी इन्स्टाग्रामवर त्यांच्या खास दिवसाची झलक दाखवली. लग्नानंतर नागाचे वडील नागार्जुन यांनी दोघांच्या लग्नाचे पहिले फोटो शेअर केले होते. आता नागा-शोभिताने त्यांच्या लग्नाचे फोटो पोस्ट केले आहेत. शोभिता धुलिपाला आणि नागा चैतन्य यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर एक संयुक्त पोस्ट केला आहे. त्यात त्यांच्या लग्नाचे आणि लग्नाच्या विधींचे अनेक फोटो आहेत.लग्नाच्या फोटोंमध्ये शोभिता धुलिपाला आणि नागा चैतन्य एकमेकांच्या प्रेमात हरवलेले दिसत आहेत.
नागा चैतन्य पांढरा धोतर-कुर्ता परिधान करून छान दिसत आहे, तर सोन्याच्या कांजीवरम साडीत सोन्याचे दागिने घातलेली शोभिताही खूप सुंदर दिसत आहे. या जोडप्याने फोटोमध्ये एकमेकांना हार घालतानाचीही झलकही दाखवली आहे. यादरम्यान शोभिता नागा चैतन्यबरोबर मस्ती करताना दिसत आहे. तर एका फोटोमध्ये शोभिता नागा चैतन्यच्या हातातील मंगळसूत्र परिधान करताना दिसत आहे. एका फोटोमध्ये शोभिता पांढऱ्या रंगाची कॉटन साडी नेसलेली दिसत आहे. यावेळी तिच्यावर फुलांचा वर्षाव होताना दिसत आहे.
दरम्यान, नागा चैतन्यचे शोभिताबरोबर हे दुसरं लग्न आहे. याआधी त्याचे लग्न समंथाबरोबर झाले होते. २०१७ साली ते लग्नबंधनात अडकले होते आणि २०२१ साली त्यांचा घटस्फोट झाला. नागा चैतन्यने एका मुलाखतीमध्ये घटस्फोटानंतर नैराश्य आल्याचे सांगितले होते. त्यानंतर आता अभिनेता दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला आहे