साऊथ सुपरस्टार राम चरण याने आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. राम चरण आणि पत्नी उपासना यांनी चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. २० जून रोजी त्यांनी गोंडस अशा चिमुकलीला जन्म दिला. राम चरण याने ही गोंडस बातमी त्याच्या चाहत्यांसोबत त्याने शेअर केली आहे. राम चरण आणि उपासना आई-बाबा झाले आहेत. आज त्यांच्या मुलीचा नामकरण सोहळा पार पाडला.(Ram charan and Upasana)
राम चरण आणि उपासना यांच्या लेकीचा नामकरण सोहळा नुकताच पार पडला असून उपासना हिने नामकरण सोहळ्यातील काही खास फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले आहेत. राम चरण आणि बायको उपासना दोघेही सोशल मीडियावर सक्रिय आहेत. ३० जून म्हणजेच आज सकाळपासून नामकरण सोहळ्याची तयारी सुरू होती. याचे फोटो उपासनाने तिच्या इंस्टाग्रामच्या स्टोरीवर शेअर केले होते. या फोटोमध्ये राम चरण याचे आई वडील आणि उपासनाचे आई वडील हे दिसत आहेत. राम चरण आणि उपासना यांनी त्यांच्या मुलीचे नाव अत्यंत खास ठेवले आहे.
पाहा काय ठेवलं रामचरणने लेकीचं नाव (Ram charan and Upasana)
राम चरण आणि उपासना यांनी त्यांच्या मुलीचे नाव कलिन कारा कोनिडेला असे ठेवले आहे. विशेष म्हणजे चाहत्यांना देखील त्यांच्या मुलीचे नाव प्रचंड आवडले आहे. उपासना हिने पोस्ट शेअर करत म्हटले की, ललिता सहस्रनामातून घेतलेल्या या नावाचा अर्थ आध्यात्मिक जागृती आणणाऱ्या ऊर्जेचे प्रतीक आहे. आजी आणि आजोबांकडून आमच्या मुलीला खूप हग…आता उपासना हिने शेअर केलेल्या पोस्टवर अनेकजण कमेंट करताना दिसत आहेत. उपासनाची ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.(Ram charan and Upasana)
एका वृत्तवाहिनेने दिलेल्या वृत्तानुसार अंबानी कुटुंबीयांनी रामचरण आणि उपासना उपासना यांच्या मुलींसाठी खास सोन्याचा पाळणा भेटवस्तू म्हणून दिला आहे. रामचरणने त्याच्या मुली आणि पत्नी सोबतचा फोटो त्याने इंस्टाग्रामवरून पोस्ट देखील केला आहे.
