बॉलीवूडमधील आघाडीचे गायक सुदेश भोसले यांचा आज वाढदिवस. सुदेश हे उत्कृष्ट गायक असण्याबरोबरच उत्तम मिमिक्री आर्टिस्टदेखील असून त्यांच्या या आवाजाचे लाखो चाहते आजही आहेत. सुदेश यांनी केवळ हिंदी, मराठी गाणी गायली नसून तर अमिताभ बच्चन, अनिल कपूर यांसारख्या बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनाही त्यांचा आवाज दिला. पण त्यांची खरी ओळख बनली, ती अमिताभ बच्चन यांचा आवाज म्हणून.(Sudesh Bhosle Birthday Special)
सुदेश यांचा जन्म मुंबईतला. लहानपणापासूनच त्यांना गायकांच्या आवाजाची नक्कल करण्याची सवय होती. पण जेव्हा त्यांनी अमिताभ बच्चन यांचा ‘मुकद्दर का सिकंदर’ चित्रपट पाहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा ते शाळेत गेले, तेव्हा त्यांनी सगळ्यांना हा आवाज काढून दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सगळ्यांनीच त्यांचे कौतुक केले. पुढे त्यांनी ऑर्केस्ट्रामध्ये व्यावसायिक गाणी गाण्यास सुरुवात करण्याबरोबर अमिताभ यांचा आवाज बनण्यासाठीची तयारी केली.

याआधी सुदेश यांनी अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटासाठी गाणं गायलं होतं. पण खरी प्रसिद्धी मिळाली ती, ‘हम’ चित्रपटातल्या ‘जुम्मा चुम्मा दे दे’ या गाण्यासाठी. गाणं तर सुपरहिट झालंच, शिवाय लोकही आश्चर्यचकित झाले होते. कारण, सुदेश यांचा आवाज अमिताभच्या आवाजाशी मिळता जुळता असल्याने लोकांना हा अमिताभचाच आवाज आहे असा भास झाला. पण याच गाण्यामुळे सुदेश यांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. नेमकं काय आहे ते कारण, पाहूया…
ज्या आवाजामुळे लोकप्रियता मिळाली तोच आवाज ठरला घातक(Sudesh Bhosle Birthday Special)
सुदेश यांचं ‘जुम्मा चुम्मा दे दे’ गाणं सुपरहिट झाल्यानंतर त्यांना अनेक ऑफर्स आल्या, पण त्या केवळ अमिताभ बच्चन यांच्या आवाजाच्या. सुदेश यांना अमिताभ व्यतिरिक्त अनेक कलाकारांच्या आवाजाचीही नक्कल येत होती, मात्र कोणालाही ह्यात रस नव्हता ज्यामुळे त्यांना अनेकदा रिजेक्शनला सामोरे जावे लागत. त्यामुळे ते डिप्रेशनचे शिकार झाले होते. पण पुढे यातून बाहेर पडत त्यांनी अनेक चित्रपट व शोजसाठी गाणी गायली व अनेक कलाकारांनाही आवाज दिला आणि आजही ते विविध कार्यक्रमांतून लोकांचे मनोरंजन करतात.(Sudesh Bhosle Birthday Special)
हे देखील वाचा – ‘बाईपण भारी देवा’…. खेळकर आणि इमोशनल
सुदेश यांना अमिताभ बच्चनशिवाय अशोक कुमार, विनोद खन्ना, संजय दत्त, संजीव कुमार, अनिल कपूर, संजीव कुमार आणि मिथुन चक्रवर्ती यांचीही मिमिक्री येते. त्याचबरोबर अनेक चित्रपटांसाठी ते डबिंग करत असून छोट्या पडद्यावरील ‘हास्य सम्राट’ या कार्यक्रमाचे परीक्षणही त्यांनी केलं आहे.