Tejaswini Pandit Post : मराठी मालिका, चित्रपट व वेबसीरिज यांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारत अभिनेत्री तेजस्विनी पंडितने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. अभिनयाबरोबरच तेजस्विनी निर्मितीक्षेत्रातही उत्तम कामगिरी बजावताना दिसते. काही दिवसांपूर्वीच तिच्या एक नंबर चित्रपटाची जोरदार चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. सोशल मीडियावरही अभिनेत्री बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती सोशल मीडियावर काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्रीने चाहत्यांसह आनंदाची बातमी शेअर केली. अभिनेत्रीने मावशी झाल्याची गुडन्यूज सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत दिली.
तेजस्विनीची बहीण पौर्णिमा पुल्लन हिने आई झाल्याची गुडन्यूज दिली. तब्बल १४ वर्षांनंतर तेजस्विनी मावशी झाली आहे. दिवाळीत लक्ष्मी घरी आल्याचा आनंद तिने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केला होता. यानंतर आता तेजस्विनीने पोस्ट शेअर करत चिमुकल्या बाळाची झलक फोटोद्वारे शेअर केली आहे. सुंदर असं कॅप्शन देत तेजस्विनीने बाळाला घेऊन काढलेला फोटो पोस्ट केला आहे. अभिनेत्रीच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे. तर काही कलाकार मंडळींनीही कमेंट करत पसंती दर्शविली आहे.
तेजस्विनीने पोस्ट शेअर करत, “माझ्यासाठीची सगळ्यात मोठी सगळ्यात खास आणि आयुष्यभराची ‘दिवाळी भेट’ माझ्या बहिणीने आणि दाजींनी मला दिली आहे”. पुढे तिने पोस्टद्वारे म्हटलं होतं की, “आमच्या घरात ‘लक्ष्मी’ आली. अनेक वर्ष या सुखाचा अनुभव घेण्यासाठी आम्ही सर्वच आसुसलेले होतो. माझ्या माणसांच्या आयुष्यातला १४ वर्षांचा अपत्यप्राप्तीसाठीचा वनवास यंदाच्या दिवाळीत संपला. त्या हॉस्पिटलच्या फेऱ्या, तिथली धावपळ, अचानक उद्भवलेले अडथळे या सगळ्यात आजूबाजूला सणाचे वातावरण आहे हे विसरायला झालं होतं पण या सगळ्यावर मात करत आमचे दिवाळीचे क्षणच नव्हे तर आयुष्य देखील या कन्यारत्नाने उजळून टाकले”.
यापुढे तिने असेही म्हटलं होतं की, “आमच्या कुटुंबाची कथा सुफळ संपूर्ण म्हणुया?, ही दिवाळी माझ्यासाठी एकदम खास आहे, मी मावशी झालेय. होऊ दे खर्च. तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. शुभ दीपावली. शुभं भवतु”, असं म्हटलं होतं.