शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

नेहा कक्करचा एक्स बॉयफ्रेंड हिमांश कोहली अडकला विवाहबंधनात, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 13, 2024 | 9:57 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Singer Neha Kakkar ex-boyfriend Himansh Kohli got married and the wedding photos viral on social media.

नेहा कक्करचा एक्स बॉयफ्रेंड अडकला विवाहबंधनात, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

‘यारियां’ चित्रपटातून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता हिमांश कोहली विवाहबद्ध झाला आहे. एकेकाळी नेहा कक्करसोबत रिलेशनशिपमध्ये असलेल्या या अभिनेत्याने १२ नोव्हेंबरला विनी कोहलीबरोबर लग्नगाठ बांधली. या लग्नाचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हिमांश कोहलीने दिल्लीतील एका मंदिरात विनीशी लग्न केले. हा विवाह एका खाजगी समारंभात झाला आहे. या लग्नसोहळ्याला कुटुंबातील काही सदस्य आणि जवळचे नातेवाईक उपस्थित होते. या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत (Himansh Kohli Marriage)

“सदैव एकत्र” असं म्हणत हिमांशने त्याचे लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. यावेळी हिमांश गुलाबी रंगाच्या शेरवानीत आणि त्याची पत्नी सोनेरी रंगाच्या साडीत अतिशय सुंदर दिसत होते. हिमांशने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे लग्नाची वरात आणि लग्नाचे काही फोटो चहात्यांबरोबर शेअर केले आहेत. हिमांशच्या नवविवाहित वधूबरोबरचे फोटो सध्या इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहेत. हिमांशने शेअर केलेल्या या फोटोवर मनोरंजन सृष्टीतील कलाकार व त्याच्या अनेक चाहते मंडळींकडून अभिनेत्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Hemansh Kohli (@kohlihimansh)

आणखी वाचा – तुळशीच्या लग्नाला करा ‘हे’ तीन फायदेशीर उपाय, धनलाभासह मिळतील अनेक फायदे, शास्त्र काय सांगतं?

बॉलिवूडची सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्कर व हिमांश एकेकाळी रिलेशनशिप मध्ये होते. नेहा कक्कर आणि हिमांश कोहली एकमेकांना खूप दिवसांपासून डेट करत होते. पण २०१८ मध्ये दोघेही वेगळे झाले. या ब्रेकअपनंतर दोघेही मोकळेपणाने बोलले. नेहादेखील कॅमेऱ्यासमोर अनेकदा व्यक्त झाल्याचे पाहायला मिळाले. हिमांश कोहली व नेहा कक्कर यांच्या लग्नाचीही चर्चा होती, मात्र या लग्नापर्यंत पोहचण्यासाठी त्यांचे ब्रेकअप झाले आणि २०२० मध्ये नेहाने रोहनप्रीतसह लग्न केले.

आणखी वाचा – 13 November Horoscope : मेष, कर्क, कुंभ राशीच्या लोकांना बुधवारी प्रत्येक काम सावधगिरीने करावे लागेल, कारण काय? जाणून घ्या…

दरम्यान, हिमांशच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर हिमांशने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे. हिमांश ‘हमसे है लाइफ’मध्ये दिसला आहे. यानंतर तो ‘यारियां’, ‘जीना इस का नाम है’, ‘रांची डायरीज’, ‘दिल जो ना कह सका’मध्येही दिसला आहे. त्याचबरोबर तो अनेक म्युझिक व्हिडीओंमधूनही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Tags: bollywood actorHimansh KohliHimansh Kohli MarriageNeha Kakkar ex Boyfriend
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Song Jae Rim Death

कोरियन अभिनेता सोंग जे रिमचे वयाच्या ३९व्या वर्षी निधन, राहत्या खोलीत सापडला मृतदेह, मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.