रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘क्राईम पेट्रोल’ फेम अभिनेता नितीन चौहानचे निधन, वयाच्या ३५ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप, टीव्ही विश्वावर शोककळा

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 8, 2024 | 9:00 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Tv Actor Nitin Chauhan Death

'क्राईम पेट्रोल' फेम नितीन चौहानचे निधन, वयाच्या ३५ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

Tv Actor Nitin Chauhan Death : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध टीव्ही अभिनेते नितीन चौहानचे आकस्मिक निधन झाले आहे. नितीनच्या निधनामुळे टीव्ही इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. नितीनने वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. टीव्ही अभिनेत्याच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. अभिनेत्याच्या निधनामुळे चाहतेही निराश झाले आहेत. नितीन ‘स्प्लिट्सविला ५’ आणि ‘क्राइम पेट्रोल’मध्येमहत्त्वपूर्ण कामगिरी करताना दिसला.

नितीन चौहान यांच्या निधनाची माहिती विभूती ठाकूर यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर पोस्टद्वारे दिली आहे. विभूती ठाकूरने तिच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्रीने नितीनबरोबरचा स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. पोस्ट शेअर करताना तिने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “रेस्ट इन पीस माय डिअर. ऐकून खूप आश्चर्य व दुःख झाले”. विभूती ठाकूर यांनी त्यांच्या पोस्टमध्ये पुढे लिहिले की, “देव तुमच्या आत्म्याला शांती देवो”. नितीन चौहानने ‘दादागिरी २’ हा रिॲलिटी शो जिंकून लोकांच्या हृदयात स्वत:साठी एक खास स्थान निर्माण केले.

आणखी वाचा – ऑस्ट्रेलियाला निघाले मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे, शेअर केला क्युट फोटो, लूकने वेधलं लक्ष

नितीन चौहान हा यूपीच्या अलीगढ जिल्ह्यातील रहिवासी होता. त्याने MTV चा ‘Splitsvilla Season 5’ हा शोदेखील जिंकला. याशिवाय नितीन ‘क्राईम पेट्रोल’ आणि ‘फ्रेंड्स’ सारख्या मालिकांमध्येही दिसला होता. ‘जिंदगी डॉट कॉम’मध्येही नितीनने काम केलं. नितीन चौहानला ‘क्राईम पेट्रोल’मधून विशेष ओळख मिळाली. नितीनच्या शेवटच्या टीव्ही मालिकेबद्दल बोलायचे झाले तर तो २०२२ मध्ये ‘तेरा यार हूं मैं’ या टीव्ही शोमध्ये दिसला होता.

आणखी वाचा – सिद्धू मूसेवालाच्या लहान भावाचा पहिला फोटो समोर, आई-वडिलांनी फोटो शेअर करत दाखवली झलक, पाहून नेटकरीही थक्क

नितीनच्या मृत्यूच्या कारणाबाबत बोलायचे झाले तर, अभिनेत्याचा मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र त्याने आत्महत्या केल्याचेही बोलले जात आहे. पोलीस सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत आहेत, मात्र अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य समोर आलेले नाही. नितीनने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नितीनचे वडील मुंबईत आले आहेत आणि अभिनेत्याचे पार्थिव अलिगढला घेऊन जाणार आहेत. मात्र, पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून अद्यापपर्यंत पोलीस किंवा कुटुंबीयांकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही.

Tags: crime petrol fame nitin chauhantelevision newsTv Actor Nitin Chauhan Death
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Paaru Marathi Serial Update

Paaru Marathi Serial : अहिल्यादेवींच्या तब्येतीला पारू कारणीभूत, आदित्यच्या नजरेतून कायमची उतरणार का?, मोठा ट्विस्ट

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.