रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

एकाच वेळी सेटवर दोघांना डेट करायच्या नायिका, सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीने उघडकीस आणला प्रकार, ‘ते’ काळं सत्य अन्…

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 7, 2024 | 6:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bollywood actress Guddi Maruti commented on love affairs on film sets.

चित्रपटांच्या सेटवरील प्रेम प्रकरणांवर बॉलीवूड अभिनेत्री गुड्डी मारुतीचं भाष्य

बॉलिवूड कलाकारांच्या व्यावसायिक आयुष्याप्रमाणेच त्यांची खाजगी आयुष्यही खूप चर्चेत असतं आणि त्यांच्या खाजगी आयुष्याबरोबर अनेकदा या कलाकारांची लव्हलाईफही चर्चेत येते. आता तर सोशल मीडियाच्या या काळात बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक किस्से आणि प्रेमकथा सोशल मीडियावर सहजपणे समोर येतात. पण एक काळ असा होता की या कथा खूप दडलेल्या होत्या. या दडलेल्या कथांवर आता सुप्रसिद्ध अभिनेत्रीने भाष्य केलं आहे आणि एक सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे ९०च्या दशकातील अभिनेत्री गुड्डी मारुती. अभिनेत्री गुड्डी मारुतीने सिद्धार्थ कन्नन यांच्याशी बोलताना बॉलिवूडमधील अशा अनेक गोष्टी उघड केल्या आहेत. (Guddi Maruti On Bollywood Love Affair)

सिद्धार्थ कन्ननच्या मुलाखतीत गुड्डी मारुतीने अशा अनेक गोष्टी उघड केल्या आहेत, ज्या अनेकदा अफवा म्हणून फेटाळून लावल्या जातात. तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ९० च्या दशकात नायिका बंद दारामागे काय करत होत्या आणि या नायिकांच्या आई त्यांच्याबरोबर सेटवर का यायच्या हे सांगितले आहे. याबद्दल बोलताना अभिनेत्रीने सांगितले की, “सेटवर लोक एकमेकांना लाईन मारायचे. नायक किंवा नायिकेची खूप अफेअर असायची”. मात्र, या संवादात तिने कोणत्याही अभिनेत्याचे किंवा अभिनेत्रीचे नाव घेतले नाही.

View this post on Instagram

A post shared by Pashmina official (@pashminnafanpage)

आणखी वाचा – सलमान खाननंतर आता शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी, आरोपी पोलिसांच्या ताब्यात, ५० लाख रुपयांची मागणी कारण…

गुड्डी मारुतीने मुलाखतीत सांगितले की, “आज सर्व काही उघडपणे होते. पण त्यावेळी तसे नव्हते. कुणी कुणाच्या बरोबर असेल तर तो मुद्दा फक्त चार भिंतींमध्येच राहायचा. अशा अनेक अभिनेत्री होत्या ज्यांचे दुस-यांबरोबर प्रेमप्रकरण होते”. यापुढे अभिनेत्रीने एका किस्स्याबद्दल सांगताना असं म्हटलं की, “एकदा चित्रपटाचा नायक मला त्याच्याबरोबर घेऊन गेला आणि म्हणाला बघ माझी नायिका आत काय करत आहे”. यापुढे गुड्डीने सांगितले की, नायिकेचे वास्तविक जीवनात नायकाशी प्रेमसंबंध होते, परंतु ती चित्रपटाच्या दिग्दर्शकाच्या खोलीत होती.

आणखी वाचा – बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध कलाकारांनी त्यांच्या तरुण मुलांना गमावलं, अजूनही ते दुःख पचवू शकले नाहीत, दुर्देव असं की…

९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री गुड्डी मारुतीने तिच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवलं. अक्षय कुमार तसेच गोविंदा यांसारख्या बड्या कलाकारांबरोबर तिने काम केले आहे. तिच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर तिने ‘खिलाडी’, ‘शोला और शबनम’, ‘आशिक आवारा’, ‘दुल्हे राजा’ आणि ‘बीवी नं १’ यांसारख्या अनेक चित्रपटात अभिनय करत प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे.

Tags: bollywood actressGuddi MarutiGuddi Maruti On Bollywood Love Affair
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
05 November 2024 Friday daily horoscope

08 November Horoscope : रवि योगाचा शुभ संयोगामुळे वृषभ राशीसह ‘या’ राशीच्या लोकांना आर्थिक लाभ, जाणून घ्या...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.