बॉलिवूड कलाकारांच्या व्यावसायिक आयुष्याप्रमाणेच त्यांची खाजगी आयुष्यही खूप चर्चेत असतं आणि त्यांच्या खाजगी आयुष्याबरोबर अनेकदा या कलाकारांची लव्हलाईफही चर्चेत येते. आता तर सोशल मीडियाच्या या काळात बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक किस्से आणि प्रेमकथा सोशल मीडियावर सहजपणे समोर येतात. पण एक काळ असा होता की या कथा खूप दडलेल्या होत्या. या दडलेल्या कथांवर आता सुप्रसिद्ध अभिनेत्रीने भाष्य केलं आहे आणि एक सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे ९०च्या दशकातील अभिनेत्री गुड्डी मारुती. अभिनेत्री गुड्डी मारुतीने सिद्धार्थ कन्नन यांच्याशी बोलताना बॉलिवूडमधील अशा अनेक गोष्टी उघड केल्या आहेत. (Guddi Maruti On Bollywood Love Affair)
सिद्धार्थ कन्ननच्या मुलाखतीत गुड्डी मारुतीने अशा अनेक गोष्टी उघड केल्या आहेत, ज्या अनेकदा अफवा म्हणून फेटाळून लावल्या जातात. तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ९० च्या दशकात नायिका बंद दारामागे काय करत होत्या आणि या नायिकांच्या आई त्यांच्याबरोबर सेटवर का यायच्या हे सांगितले आहे. याबद्दल बोलताना अभिनेत्रीने सांगितले की, “सेटवर लोक एकमेकांना लाईन मारायचे. नायक किंवा नायिकेची खूप अफेअर असायची”. मात्र, या संवादात तिने कोणत्याही अभिनेत्याचे किंवा अभिनेत्रीचे नाव घेतले नाही.
आणखी वाचा – सलमान खाननंतर आता शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी, आरोपी पोलिसांच्या ताब्यात, ५० लाख रुपयांची मागणी कारण…
गुड्डी मारुतीने मुलाखतीत सांगितले की, “आज सर्व काही उघडपणे होते. पण त्यावेळी तसे नव्हते. कुणी कुणाच्या बरोबर असेल तर तो मुद्दा फक्त चार भिंतींमध्येच राहायचा. अशा अनेक अभिनेत्री होत्या ज्यांचे दुस-यांबरोबर प्रेमप्रकरण होते”. यापुढे अभिनेत्रीने एका किस्स्याबद्दल सांगताना असं म्हटलं की, “एकदा चित्रपटाचा नायक मला त्याच्याबरोबर घेऊन गेला आणि म्हणाला बघ माझी नायिका आत काय करत आहे”. यापुढे गुड्डीने सांगितले की, नायिकेचे वास्तविक जीवनात नायकाशी प्रेमसंबंध होते, परंतु ती चित्रपटाच्या दिग्दर्शकाच्या खोलीत होती.
९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री गुड्डी मारुतीने तिच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवलं. अक्षय कुमार तसेच गोविंदा यांसारख्या बड्या कलाकारांबरोबर तिने काम केले आहे. तिच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर तिने ‘खिलाडी’, ‘शोला और शबनम’, ‘आशिक आवारा’, ‘दुल्हे राजा’ आणि ‘बीवी नं १’ यांसारख्या अनेक चित्रपटात अभिनय करत प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे.