मुलांसाठी आई-वडील सर्व काही करतात. त्यांना जन्म देण्यापासून, त्यांचे शाळेत पहिले पाऊल टाकण्यापासून ते आयुष्यात स्वत:च्या पायावर उभे राहीपर्यंत सर्वकाही करतात. कधी मुलांचे पोटं भरण्यासाठी आई स्वत:च्या वाटणीची चपातीही लेकराला देते तर वडील मुलांचे हट्ट पुरवण्यासाठी स्वत:साठी नवीन वस्तू खरेदी करत नाही. आईवडील मुलांसाठी भरपूर कष्ट करतात. मुलांसाठी इतके कष्ट करुन जेव्हा आयुष्याच्या एका वळणावर मुलं पालकांना कायमचे सोडून जातात अशा आई-वडिलांचे दु:ख तेच जाणो. मनोरंजन विश्वातील असे अनेक कलाकार आहेत, ज्यांना त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांची मुलं सोडून गेली.
चित्रपट निर्माते कृष्ण कुमार यांनी नुकतीच त्यांची २१ वर्षांची मुलगी तिशा कुमार गमावली होती. कर्करोगाशी लढा देत असताना १८ जुलै रोजी तिशाचा मृत्यू झाला. आपल्या तरुण मुलीच्या मृत्यूनंतर कृष्ण कुमार पूर्णपणे खचून गेले. आपल्या मुलीच्या मृत्यूवेळी कृष्ण कुमार यांची अवस्था कोणत्याही बापाला न पाहवणारी होती.

विनोदी अभिनेते शेखर सुमन यांनी अनेकदा आपल्या कॉमेडीने लोकांना हसवलं आहे. पण अभिनेत्याच्या हास्यामागे त्याच्या मुलाच्या निधनाचे कौतुक आहे. अभिनेता शेखरलाही त्याच्या १२ वर्षांच्या मुलाच्या मृत्यूचे दुःख झाले आहे. आपल्या मुलाच्या निधनाचा क्षण आठवून शेखर अजूनही थरथर कापतो. मुलाच्या निधनाचे दु:ख आजही अभिनेत्याच्या मनात आहे.

आपल्या सुमधुर आवाजाने लोकांच्या मनावर राज्य करणाऱ्या प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांचे आयुष्यही अनेक वेदनांनी भरलेले आहे. त्यांनी आपला नवरा गमावला आणि त्यानंतर त्यांच्या मुलानेही या जगाचा निरोप घेतला. अनुराधा पौडवाल यांच्या ३५ वर्षांच्या मुलाने कोविडच्या काळात या जगाचा निरोप घेतला. त्यांचा मुलगा किडनीच्या आजाराने त्रस्त होता.

अभिनेते कबीर बेदी यांना त्यांच्या मुलांच्या अकस्मित निधनाचे दु:ख होते. आयुष्यात चार वेळा लग्न थाटणारे कबीर बिनधास्तपणे आयुष्य जगण्यासाठी ओळखले जातात, पण त्यांच्याही आयुष्यात एक खोल जखम आहे. हे दुःख म्हणजे त्यांनी त्यांच्या तरुण मुलाला कायमचे गमावले आहे. त्यांचा मुलगा सिद्धार्थने वयाच्या २६ व्या वर्षी आत्महत्या केली होती.
बॉलिवूडसह अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करणारे अभिनेते प्रकाश राज आपल्या मुलाच्या निधनाच्या दु:खात आहेत. २००४ मध्ये त्यांच्या पाच वर्षांच्या मुलगा सिद्धूचं दुर्दैवी निधन झालं. त्यावेळी ते ललिता कुमारी यांच्याशी विवाहित होते. मुलाच्या निधनाने त्यांना मोठा धक्का बसला, अंत्यसंस्काराच्या वेळीचा प्रसंग त्यांचासाठी खूपच कठीण होता. या घटनेमुळे त्यांच्या जीवनाबद्दलच्या दृष्टिकोनात खोलवर बदल झाला.
हिंदी चित्रपटांतली प्रसिद्ध अभिनेत्री मौसमी चटर्जी यांनाही आपल्या तरुण मुलीला गमवावं लागलं होतं. पायल या आपल्या मुलीच्या निधनाने अभिनेत्री अनेक काळ दु:खात होत्या. पायलला मधुमेह झाला आणि ती ३० महिने कोमात होती. २०१९ मध्ये तिचे निधन झाले होते.