रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“पहिली शालिनीच मस्त होती”, ‘सुख म्हणजे…’ फेम माधवी निमकरला प्रेक्षकांच्या कमेंट, म्हणाले, “कमाल अभिनय…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑक्टोबर 30, 2024 | 3:49 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Sukh Mhanje Nakki Kay Asta serial fame shalini aka Actress Madhavi Nimkar fans praised her for performance.

'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतील शालिनी म्हणजेच अभिनेत्री माधवी निमकरचे चाहत्यांकडून कौतुक

छोट्या पडद्यावर सध्या चर्चेत असलेल्या मालिकांमध्ये ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेचे नावदेखील अग्रक्रमी आहे. एका श्रीमंत घरात काम करण्यापासून सुरू झालेला गौरीचा प्रवास त्याच घराची मालकीण बनण्यापर्यंत कथा मालिकेत दाखवण्यात आली आहे. जयदीप-गौरी प्रमाणेच नित्या आणि अधिराज ही जोडीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. मालिकेने लीप घेतल्यानंतर कथानकात काही नवीन पात्रे आली. मात्र शालिनी हे एक पात्र सारखेच राहिले. दीप-गौरीबरोबर शिर्के-पाटील कुटुंबांतील अनेक सदस्यांच्या मृत्यूला शालिनी जबाबदार होती. नव्या रुपात आणि नव्या मनसुब्यांसह शालिनी पुन्हा आली. (Madhavi Nimkar Appreciation By Fans)

मालिकांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांचा एक वेगळाच चाहतावर्ग असतो. रोज टीव्हीवर दिसणारे हे कलाकार प्रेक्षकांना आपले वाटत असतात. त्यामुळे या कलाकारांबाबतच्या प्रत्येक गोष्टी प्रेक्षक सोसजळ मीडियाद्वारे शेअर करत असतात. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील शालिनी म्हणजेच अभिनेत्री माधवी निमकरने खलनायिकेची भूमिका साकारली असली तरी तिची भूमिका आवडणारा एक वेगळाच चाहतावर्ग आहे. ही चाहते मंडळी सोशल मीडियाद्वारे तिच्याबद्दलच्या प्रत्येक अपडेट्स शेअर करत असतात. अशातच माधवीच्या एक फॅन पेजने माधवीच्या मालिकेतील एका सीनचा खास व्हिडीओ शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by सुख म्हणजे नक्की काय असतं- शालिनी 🔥👑 (@maadhavi_beautyqueen)

आणखी वाचा – “माझ्या आईच्या साडीने पेट घेतला अन्…”, ‘नवरी मिळे…’ फेम लीलाने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “फटाक्यामुळे…”

माधवीच्या एक फॅन पेजने मालिकेतील एका नुकत्याच झालेल्या भागाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओखाली चाहत्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या व्हिडीओखाली एकाने कमेंट करत असं म्हटलं आहे की, “काहीपण म्हणा… जुनी शालिनीच खूप मस्त होती. तिची भाषा, तिच वागणं…  पण माधवीचा अभिनय कमाल आहे. खरंच माधवी निमकर या ताईंना मी याआधी कधीच पाहिला नव्हता. पण या मालिकेमध्ये त्यांना पहिल्यांदा पाहिलं. खरंच खूप छान अभिनेत्री आहेत”.

आणखी वाचा – दिवंगत नेते विलासराव देशमुखांची दोन्ही मुलं विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात, रितेशचा भावांना पाठिंबा, म्हणाला, “अभिनंदन आणि…”

तर आणखी एकाने शालिनी या पात्राचे कौतुक करत असं म्हटलं आहे की, “शालिनी या पात्राशिवाय मालिकेला काहीच मज्जा नसती आली. मालिकेत गौरी-जयदीप महत्त्वाचे आहेत, तेवढीच शालिनीसुद्धा खूप महत्त्वाची आहे. माधवी ताई तुझे खूप खूप कौतुक. शालिनी या पात्रामुळे मालिकेला खूप खूप रंगत आणली”. दरम्यान, शालिनी फेम माधवी निमकरनेदेखील या सर्वांचे आभार मानले आहेत. इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे माधवीने या सर्व चाहत्यांना धन्यवाद असं म्हटलं आहे.    

Tags: madhavi nimkarMadhavi Nimkar Appreciation By FansSukh Mhanje Nakki Kay Asta Fame Shalini
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Divyanka Tripathi Shared Goodnews

लग्नाच्या सात वर्षांनी दिव्यांका त्रिपाठी गरोदर?, दिवाळी पार्टीतील 'त्या' व्हिडीओमुळे रंगली चर्चा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.