Siddharth Chandekar Family Video : मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर नेहमीच चर्चेत असतो. मालिका, चित्रपट यांमधून सिद्धार्थने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. सोशल मीडियावरही सिद्धार्थ बऱ्यापैकी सक्रिय असतो. नेहमीच तो काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. सिद्धार्थ सध्या ‘मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद ३’ या ‘स्टार प्रवाह’वरील कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी स्वीकारली. या रिऍलिटी शोमध्ये सिद्धार्थ नेहमीच उपस्थितांचे सहभागी स्पर्धकांचे मनोरंजन करत असतो. अनेकदा लहानग्या स्पर्धकांना व परीक्षकांनाही तो सरप्राइज देत असतो.
आता दिवाळीच्या सणानिमित्त खास आदर्श शिंदेने सिद्धार्थला एक गोड सरप्राइज दिलं आहे. याच प्रोमो सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये ‘मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद ३’ या शोच्या रंगमंचावर सिद्धार्थ चांदेकरचे कुटुंबीय त्याला भेटण्यासाठी आलेले दिसत आहेत. अभिनेत्याची पत्नी मिताली मयेकर, त्याची आई सीमा चांदेकर आणि त्याचे सावत्र वडील नितीन म्हसवडे हे सिद्धार्थचे कुटुंबीय या कार्यक्रमात उपस्थित राहिल्याचं दिसलं.
आणखी वाचा – Appi Aamchi Collector : गंभीर आजाराचा अमोलला पुन्हा त्रास, अप्पी-अर्जुनला त्याच्या आजारपणाविषयी कळणार का?
सिद्धार्थ चांदेकरच्या आईने गेल्यावर्षी दुसरं लग्न केलं. सिद्धार्थ व मिताली या दोघांनी पुढाकार घेत त्यांच्या आईचं म्हणजेच सीमा चांदेकर यांचं दुसरं लग्न लावलं. यावेळी लेकाचा व सूनेचा पुढाकार पाहायला मिळाला. अनेकांनी या गोष्टीमुळे त्यांचं भरभरुन कौतुकही केलं. यानंतर हे कुटुंबीय पहिल्यांदाच नॅशनल टेलिव्हिजनवर एकत्र आले आहेत. व्हिडीओमध्ये सगळ्यात आधी मिताली येते, मितालीला पाहून सिद्धार्थला आनंद होतो. दोघंही एकमेकांना मिठी मारतात. यानंतर मागून आई आल्याचं पाहताच सिद्धार्थ एकदम भारावून जातो.
आणखी वाचा – युट्यूबर अरमान मलिकच्या चौथ्या लग्नाचं गुपित काय?, बायको पायलनेही केलं भाष्य, म्हणाली, “दोन बायका असूनही…”
त्यापाठोपाठ त्याचे वडील नितीन म्हसवडे हे सुद्धा येतात, तेव्हा सिद्धार्थ त्यांची साऱ्यांना ओळख करुन देतो. सिद्धार्थ आमच्या कुटुंबाचे नवे सदस्य असं सांगत सर्वांना त्यांची ओळख करुन देतो. तसेच हे दोघंही एकमेकांना खूप चांगली साथ देतात असंही सिद्धार्थ यावेळी म्हणताना दिसतोय. सिद्धार्थचे सावत्र वडील नितीन यावेळी असं म्हणताना दिसत आहेत की, “आयुष्याच्या व्याकरणातील सगळे नियम आता मोडलेत आणि आता आम्ही सगळेजण एकमेकांसाठी सर्वस्व आहोत”. त्यानंतर सिद्धार्थच्या आईने दिवाळीनिमित्त लाडक्या लेकाचं औक्षण देखील केलं.