अरमान मलिक हा आपल्या दोन्ही पत्नींबरोबर ‘बिग बॉस ओटीटी २’ च्या घरात आला होता. अरमान दोन्ही पत्नींबरोबर ‘बिग बॉस’च्या घरात दाखल झाल्याने त्याच्यावर जोरदार टीका ही करण्यात आली होती. अरमान मलिकने पायलबरोबर घटस्फोट न घेता कृतिकाबरोबर लग्न केले. कृतिका आणि पायल आता एकाच घरात राहतात. अशातच आता सोशल मीडियासह सर्वच माध्यमांवर त्याच्या चौथ्या लग्नाच्या चर्चा होताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आता खरच त्याचं हे चौथं लग्न आहे का? नक्की खरी परिस्थिती काय आहे? याबाबत मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. (armaan malik fourth wife)
सोशल मीडियावर आपल्या खासगी आयुष्याबद्दल प्रत्येक अपडेट शेअर करताना मलिक कुटुंबिय कायमच दिसतात आणि त्यांनी करवा चौथचाही व्लॉग पोस्ट केला. त्यांच्या मुलांची केअरटेकर लक्षदेखील व्लॉग तयार करते आणि करवा चौथच्या दिवशी तिनेही व्लॉग रेकॉर्ड केला. तिचा व्लॉग पाहून नेटकऱ्यांनी ही गोष्ट लक्षात आणून दिली की, तिच्या हातावरील मेहंदीमध्ये संदीप उर्फ अरमान मलिकचे नाव लिहिले आहे. याबद्दल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा झालेलीदेखील दिसून आली. यावर आता अरमान व त्याच्या दोन्ही पत्नींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
सोशल मीडियावर चर्चा झाल्यानंतर अरमानने सांगितलं की, “लोक म्हणत आहेत की अरमान त्याच्या दोन्ही पत्नींबरोबर राहत असतानादेखील तिसरे लग्न केले आहे. लक्ष्यच्या हातावर संदीप असे लिहिले आहे. लक्ष्य सरदार कुटुंबातील आहे. त्यामुळे संदीप पुरुष किंवा स्त्रीदेखील असू शकतो. तसेच तिने संदीप लिहिले आहे ते कशावरून माझेच नाव आहे? कदाचित लक्ष्यचा संदीप नावाच्या मुलाबरोबर साखरपुडाही झाला असेल. तिचे आयुष्य, तिची मर्जी. प्रत्येक गोष्टीमध्ये माझं नाव घेणं गरजेचं आहे का?”.
यानंतर पायल म्हणाली की, “आम्हाला ट्रोल केलं जात आहे. आम्ही दोन बायका असूनही तिसऱ्या बायकोला परवानगी कशी दिली? असा प्रश्न सगळेजण विचारत आहेत. सगळं सहन करायला आम्ही वेडे नाही आहोत. लक्ष्यने संदीप नाव का लिहिले? हे मी तिला स्वतःला सांगायला लावेन”. दरम्यान आता या सगळ्यावर लक्ष्य काय म्हणाणर याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.