दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी सध्या खूप चर्चेत आहे. आजवर तिने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात ती सीता मातेची भूमिका साकारणार आहे. तिचा पहिला लूक सोशल मीडियावर लिक झाला होता. आता त्यामुळे तिचे चाहते तिच्या चित्रपटाची खूप वाट बघत आहेत. मात्र आता ती तिच्या अभिनय किंवा चित्रपटामुळे नाही तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. साई पल्लवीचा समोर आला होता. ज्यामध्ये तिने भारतीय सेनेविषयी भाष्य केले होतं यामुळे आता सर्वत्र आता चर्चा सुरु आहे. हे प्रकरण नक्की काय आहे? याबद्दल जाणून घेऊया. (sai pallavi get trolled)
पल्लवीचा हा व्हिडीओ जानेवारी २०२२ मधील आहे. यामध्ये ती “भारतीय सैन्यदल एक आतंकवादी लोकांचा समूह आहे असं पाकिस्तानातील लोक म्हणतात. पण आपल्यासाठी ते तसे नाहीत. मला हा हिंसाचार समजूनच येत नाही” असं भाष्य केले होते. यावर आता सर्वच स्तरातून चर्चा होताना दिसून येत आहे. यामुळे प्रेक्षकवर्क मोठ्या प्रमाणात नाराज होताना दिसून येत आहे. यामुळे साई पल्लवी ‘रामायण’ चित्रपटात सीतेची भूमिका साकरु शकत नाही असंदेखील प्रेक्षक म्हणत आहेत.
रामायण को काल्पनिक बताने वालो , यह देखो प्रमाण श्री लंका में मिली कुम्भकर्ण की तलवार जहा भी खुदेगा वही से निकलेगा #BoycottSaiPallavi #SSMB29 #GoldRate #GameChanger #IsraelIranWar #TVKVijay #C295MadeInIndia #MirzapurTheFilm #MondayMotivation pic.twitter.com/AmLFjriaip
— deepak namdev { modi ka parivar } (@deepaknamdev335) October 28, 2024
साई पल्लवीने भारतीय सैन्यदलाबद्दल केलेल्या भाष्यामुळे नेटकऱ्यांनी तिला सुनावण्यास सुरुवातदेखील केली होती. ट्विटरवर नेटकऱ्यांनी ‘बॉयकॉट साई पल्लवी’ व ‘बॉयकॉट’ ‘रामायण’ असे हॅशटॅग वापरले आहेत. एकाने ट्विट करत लिहिले की, “वेडी पिंपल क्वीनने भायतीय सैन्यदलाची माफी मागावी, #BoycottSaiPallavi”, तसेच अजून एकाने प्रतिक्रिया दिली की, “कम्युनिस्ट ही कम्युनिस्ट असते. #Boycottsaipallavi”, असे लिहिले आहे.
नेटकऱ्यांनी साई पल्लवीवर निशाणा साधला आहे. दरम्यान साई पल्लीवी रणबीर कपूरबरोबर ‘रामायण’मध्ये दिसणार आहे. यामध्ये यश रावणाची भूमिका करताना दिसणार आहे. त्यामुळे आता तिच्या भूमिकेवर प्रेक्षक नक्की काय प्रतिक्रिया देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.