शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“ठाणे महानगरपालिका झोपेच्या शोधात”, कचरा प्रकरणी शशांक केतकरची पुन्हा एकदा पोस्ट, सत्य परिस्थिती दाखवत म्हणाला, “देश असाच घाण…”  

Saurabh Moreby Saurabh More
ऑक्टोबर 28, 2024 | 10:52 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Marathi actor Shashank Ketkar shared video of garbage in Thane, which contains many items like liquor bottles, plastic, thermocol.

शशांक केतकरने ठाणे शहरातील कचऱ्याचा आणखी एक व्हिडीओ शेअर केला असून याबद्दल खोचक पोस्टही शेअर केली आहे

मराठी अभिनेता शशांक केतकर हा मालिका विश्वातला लोकप्रिय चेहरा आहे. त्याने आजवर अनेक मालिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. अभिनयाशिवाय सोशल मीडियावरील त्याच्या अनेक सामाजिक विषयांवरील व्हिडीओमुळेही चर्चेत राहत असतो. याआधी त्याने अनेकदा रस्त्यावरील कचऱ्याबाबत व्हिडीओ केले असून त्याच्या या व्हिडीओमुळे प्रशासनाने दखल घेत त्या ठिकाणचा कचरा उचलला असल्याचे पाहायला मिळाले आहे. गेल्या आठवड्यात त्याने मालाड मालवणीमधील कचऱ्याचा व्हिडीओ शेअर केला होता आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रशासनाने इथला कचरा उचलला. अशातच आता शशांकने पुन्हा एकदा त्याच्या ठाणे शहरातील कचऱ्याचा आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे.   (Shashank Ketkar Garbage Video)

शशांकने हा खास व्हिडीओ शेअर करत असं म्हटलं आहे की, “सुप्रभात, दिवाळी अगदी तोंडावर आली आहे. सगळीकडेच छान रोषणाई आणि साफसफाई केली जात आहे. आमच्या ठाण्यात घाणेकर चौकातही स्वच्छता आणि रोषणाई आहे. तिथे मोठा डिजिटल स्क्रीन आहे, ज्यावर अनेक राज्यकर्त्यांच्या व बिल्डर्सच्या जाहीराती लावल्या जातात. त्यामुळे तो चौक मोठा असल्याने तिथे स्वच्छता ठेवली जाते. त्याजवळच मी राहत असलेल्या सोसायटीतही ठाणे महानगरपालिकेने स्वच्छता ठेवलेली आहे, ती मी तुम्हाला दाखवतो. त्यामागे एक योजनाही आहे ती काय आहे ते मी तुम्हाला सांगतो”. यापुढे शशांकने मैदानाजवळची काही दृश्ये दाखवली आहेत, ज्यात खूप कचरा असल्याचे पाहायला मिळत आहे. या कचऱ्यामध्ये दारूच्या बाटल्या, खराब गादी, खाऊचे पाकीट, प्लॅस्टिक, तंबाखू, फ्लेक्स, लाकूड, पेपर, थर्माकॉल आणि देव्हारा अशा काही वस्तू आहेत.

View this post on Instagram

A post shared by Shashank Ketkar (@shashankketkar)

आणखी वाचा – जान्हवीपाठोपाठ आता निक्की व अरबाजही जाणार सूरजच्या गावी, व्हिडीओ कॉल करत म्हणाली, “भावा लवकरच…”

यापुढे त्याने असं म्हटलं आहे की, “मला घाम आला आहे कारण मी ऑक्सीजनच्या शोधात मॉर्निंग वॉकला गेलो होतो. मैदानाजवळ काही मुलं खेळत आहेत फिटनेसच्या शोधात आणि ठाणे महानगरपालिका आहे झोपली आहे दिवाळीची आनंदात… ठाणे महानगरपालिकेने आमची सोसायटी अगदी स्वच्छ ठेवली आहे. खरंतर ही सजावट नसून दिवाळीचे प्रदर्शन आहे. इथे खूप स्वस्तात गोष्टी मिळत आहेत, त्यामुळे पटपट येऊन उचला. गेले आठ दिवस हा कचरा इथे आहेच, पण यापुढे अजून किती दिवस हे इथे असेल ते माहीत नाही”.

आणखी वाचा – मायरा वायकुळच्या चिमुकल्या भावाचा पहिला फोटो समोर, आहे खूपच गोड, नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव

तसंच या व्हिडीओच्याखाली कॅप्शनमध्ये त्याने अनेक राजकीय पक्षांना तसंच महानगरपालिकेला टॅग करत असं म्हटलं आहे की, “धन्यवाद सर्वांनी ठरवलं तर देश असाच घाण राहू शकतो. आम्हीसुद्धा तुम्हाला मदत करू.. सगळे मिळून घाण करू. आली आली दिवाळी, असाच कचरा दिसूदे रोज सकाळी”. दरम्यान, या व्हिडीओखाली शशांकच्या या कृतीचे अनेकांनी समर्थन केलं आहे. तसंच त्याच्या या कृतीबद्दल कौतुकही केलं आहे.          

Tags: shashank ketkarShashank Ketkar Garbage VideoShashank Ketkar Garbage Video News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Prasad Jawade wife Amruta Deshmukh posted a special post for him as he received the Zee Marathi 2024 Best Actor award

"साताऱ्यात वनवास भोगायला पाठवलं पण…", नवऱ्याला पुरस्कार मिळाल्यानंतर अमृता देशमुखची पोस्ट, म्हणाली, "खूप अडचणी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.