Kajol Mother Stunned To Hear Her Fake Death News : ‘दो पत्ती’ या थ्रिलर चित्रपटातील पाहुण्यांचे ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या नवीन भागात दणक्यात स्वागत करण्यात आले. काजोल देवगण, क्रिती सेनन, शाहीर शेख आणि कनिका धिल्लन यांनी मंचावर सहभाग घेतला. कपिलने पाहुण्यांसह काही मजेदार संवाद साधला. कपिलने काजोलला तिने स्वतःबद्दल ऐकलेल्या विचित्र अफवाबद्दल विचारले. काजोल म्हणाली, “मला स्वत: गुगलची गरज कधीच लागली नाही, कारण जर माझ्याबाबत विचित्र असेल तर लोक मला कॉल करतील किंवा मला मेसेज पाठवतील”.
जेव्हा कपिल शर्माने कोणती बातमी विचारली तेव्हा काजोल म्हणाली, “दर ५-१० वर्षांनी एक बातमी येते की, माझा मृत्यू झाला आहे. सोशल मीडियावर यापूर्वीही अनेकदा असे घडले आहे. एकदा कोणीतरी माझ्या आईला फोन करुन सांगितले की विमान अपघातात माझा मृत्यू झाला. त्या काळात सोशल मीडिया नव्हता त्यामुळे आईला मी फोन करेपर्यंत थांबावे लागले. हे अलीकडे अनेक वेळा घडले, मला वाटते की एक व्हिडीओ व्हायरल झालाय की माझा मृत्यू झाला आहे”.
काजोलच्या या प्रसंगावर क्रितीने प्रतिक्रिया दिली आणि म्हणाली, “हे खूप वाईट आणि खूप भयानक आहे, असे कोणाबरोबरही होऊ नये”. याशिवाय एपिसोडमध्ये कपिलने गंमतीने विचारले, “काजोल मॅडम, तुम्ही आता पोलिसाची भूमिका साकारत असल्याने अजय सरांनी तुम्हाला ‘आता माझी सटकली’ म्हणायला शिकवले का?, यावर काजोलने उत्तर दिले की, तिने पती अजयचा कोणताही सल्ला घेतला नाही आणि कारण विचारले असता, तिचे उत्तर मजेदार उत्तरही दिले.
ती गंमतीने म्हणाली की, तुम्ही ही गोष्ट विसरालत का की, मीच त्याला सिंघमसाठी प्रशिक्षण दिले होते. अभिनेत्रीने अशीही माहिती दिली की, तिने ‘सिंघम’साठी अजयला मराठी भाषा शिकण्यासाठी मदत केली होती. या व्यतिरिक्त काजोल व क्रिती यांनी ‘दिलवाले’च्या दिवसापासून ते किती बदलले आहेत याबद्दल भाष्य केलं. जिथे जवळजवळ ८ वर्षांपूर्वी दोघे पहिल्यांदा पडद्यावर एकत्र दिसले होते आणि त्यांनी चित्रपटात बहिणींची भूमिका केली होती. दोघांनी एकमेकांबद्दलचे अनेक रंजक किस्से शेअर केले.