Suraj Chavan New Home : ‘बिग बॉस’ मराठी सीझन ५ चा विजेता सूरज चव्हाणचं हक्काच्या घराचं स्वप्न आता पुर्णत्वास येत आहे. काल सूरजच्या घरी भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. ‘बिग बॉस मराठी’मुळे सूरज चव्हाणला विशेष लोकप्रियता मिळाली आहे. ‘बिग बॉस’मुळे सूरज चव्हाण हे नाव घराघरांत पोहोचलं. हलाखीच्या परिस्थितीतून आलेल्या सूरज चव्हाणच आयुष्य क्षणाधार्त बदललं. टिकटॉकमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेला सूरज करोनानंतर नाहीसा झाला होता. अखेर सूरजने ‘बिग बॉस’च्या माध्यमातून कमबॅक केलेलं पाहायला मिळालं. सूरजने ‘बिग बॉस’ची ट्रॉफी जिंकून अनेकांची मन जिंकली. सोशल मीडियावर सूरजचा खूप मोठा चाहतावर्ग आहे.
मूळचा बारामतीचा असलेला सूरज सध्या ‘बिग बॉस’नंतर त्याच्या गावी कुटुंबासह वेळ घालवत आहे. आपलं स्वतःच हक्काचं घर असावं असं सूरज ‘बिग बॉस’च्या घरातही बोलताना दिसला. इतकंच नव्हे तर त्याची सह्स्पर्धक अंकिता वालावलकर हिने देखील घर बांधण्यास ती काहीतरी मदत करेल असं आश्वासन सूरजला दिलं. अंकिता व सूरजच भावा बहिणीचं नातं पाहायला मिळालं. आता अखेर सूरज चव्हाणच्या हक्काच्या घराचं स्वप्न आता पुर्णत्वास येत आहे. काल त्यांच्याकडे भूमिपूजन कार्यक्रम पार पडला. याचा व्हिडीओ सूरजने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन पोस्ट केला आहे.
आणखी वाचा – Zee Marathi Awards 2024 : सोहळ्यात ‘या’ अभिनेत्रीने पटकावले अनेक पुरस्कार, लक्षवेधी चेहरा ठरला…; वाचा यादी
काल अखेर सूरजच्या घराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. गावकऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडलेला पाहायला मिळाला. तर दुसरीकडे त्याच्या राहत्या घरात विज जोडण्याचे कामही सुरु होते. सूरजच्या घरात वीज पुरवठा होत नव्हता त्यामुळे स्थानिक माध्यमांनी याबाबतची दखल घेतली. वीजपुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितले की, आतापर्यंत कधीही सूरज चव्हाणने वीज मागणी केली नव्हती. मात्र बारामतीचे तहसीलदार, व वीज विकास अधिकारी गावात आले चर्चा झाली आणि मग सूरजचा अर्ज घेतल्यानंतर त्याच्या घरात विजेचा पुरवठा सुरु करण्यात आला. त्यामुळे काल अधिकृतरित्या सूरज चव्हाणच्या घरात वीज आली.
अंकिताने सूरजच्या घराबाबतही अपडेट दिली आहे. व्हिडीओ शेअर करत अंकिता म्हणाली, “आज सूरजच्या घराचं काम सुरु होतंय. मला आमंत्रण देण्यात आलं होतं. माझं आणि सूरजचं बोलणं झालं. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर आल्यानंतर मी बरेच दिवस घरी आले नव्हते, इतकंच नाही तर इथून मला ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांना सुद्धा मला भेटायचं आहे. ज्या लोकांनी माझ्यासाठी मेहनत घेतली त्या लोकांना वेळात वेळ काढून मी भेटत आहे. त्यामुळे मी इथून मुंबईत जाईन आणि मग मुंबईहून सूरजच्या गावी जाणार आहे. सूरजचं आणि माझं बोलणं झालं तो खूप खुश आहे”.