Jaya Bachchan Mother Demise News False : जया बच्चन यांच्या आई इंदिरा भादुरी यांच्या निधनाची बातमी खोटी असल्याचं समोर आलं आहे. अभिनेत्रीची आई सध्या रुग्णालयात दाखल आहे. इंदिरा भादुरी यांच्या पाठीचा कणा तुटला होता, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. जया बच्चन यांच्या आईचे निधन झाल्याचा दावा अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता. मात्र या बातम्या खोट्या असल्याचे सिद्ध झाले आहे. जया बच्चन यांच्या आई इंदिरा भादुरी यांच्या केअरटेकर यांनी स्वतःच याबाबतची अपडेट माध्यमांना दिली आहे.
‘एबीपी न्यूज’शी बोलताना इंदिरा भादुरी यांची केअरटेकर बबली म्हणाली की, “इंदिरा भादुरी पूर्णपणे निरोगी आहेत. केवळ त्यांच्या पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला आहे”. इंदिरा भादुरी यांच्या केअरटेकरच्या म्हणण्यानुसार, त्यांना सध्या कोणत्याही प्रकारचा त्रास होत नसून त्या आता आराम करत आहेत. बबली म्हणाली, “त्या ठीक आहेत, त्यांच्या मणक्याला किरकोळ फ्रॅक्चर आहे, त्यामुळे त्या उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये आहेत. त्या खात- पीत आहेत आणि बोलतही आहेत”.
आणखी वाचा – ‘लाखात एक…’ फेम नितीश चव्हाण भावाला घट्ट मिठी मारुन स्टेजवरच रडला, पायाही पडला अन्…; भावुक व्हिडीओ समोर
अभिषेक व जया भेटायला येणार का असे विचारले असता केअरटेकरने उत्तर दिले, “माहित नाही, पण ते नक्की भेटायला येतील. त्यांचं कुटुंब नेहमीच त्यांना भेटायला येत असतं”. जया बच्चन यांची आई आणि अमिताभ बच्चन यांच्या सासू इंदिरा भादुरी या भोपाळच्या श्यामला हिल्स येथील अन्सल अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांचे पती तरुण भादुरी हे अनेक वृत्तपत्रांमध्ये काम करणारे पत्रकार होते. ते उत्तम लेखकही होते. तरुण भादुरी यांनी १९९६ मध्येच जगाचा निरोप घेतला. त्यानंतर इंदिरा भादुरी एकट्या राहत आहेत.
जया बच्चन यांची आई इंदिरा भादुरी यांच्यावर गेल्या वर्षी शस्त्रक्रिया झाली होती. हृदयाशी संबंधित समस्यांमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, इंदिरा भादुरी यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते जेथे त्यांच्यावर पेसमेकर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पेसमेकर शस्त्रक्रियेमध्ये, कॉलरबोनच्या अगदी खाली छातीत पेसमेकर लावला जातो आणि त्यात बॅटरी, सर्किटरी आणि एक ते तीन विद्युत तारा असतात. पेसमेकर हृदयाच्या ठोक्यांवर लक्ष ठेवतो आणि ते मंद असल्यास त्याचा वेग वाढवतो.