बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याच्या पत्नी आलिया यांच्यात बरेच वाद काही दिवसांपासून सुरु आहेत. त्यांच्या नात्यात पडलेल्या वादाच्या ठिणगीचे रूपांतर हे घटस्फोटापर्यंत येऊन पोहोचले आहे. यावर नवाजुद्दीन सिद्दीकी आणि आलिया या दोघांनीही भाष्य केलं. आता मात्र आलियाने शेअर केलेल्या फोटो आणि कॅप्शनने पुन्हा एकदा साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. नवाजुद्दीन आणि आलिया यांच्यात घटस्फोटाची प्रक्रिया सुरु असतानाच आलियाने शेअर केलेल्या एका बातमीने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. आलियाने तिच्या नव्या जोडीदाराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावरून पोस्ट करत नव्या आयुष्याबद्दल भाष्य केलं आहे.(Aaliya Siddiqui Bf)
पाहा आलियाने फोटो शेअर करत दिली नव्या बॉयफ्रेडबद्दल माहिती (Aaliya Siddiqui Bf)
आलियानं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने लिहिलं आहे की, ‘जे नातं मी स्वीकारलं होतं त्या नात्यातून बाहेर पडण्यासाठी मला कमी नाही तर तब्बल १९ वर्षे लागली. माझ्या आयुष्यात मुलं ही सर्वात प्रथम आहेत आणि कायम राहतील. परंतु काही नाती अशी असतात की, जे मैत्रीपैक्षा जास्त महत्त्वाची असतात. आणि माझ्या आयुष्यात आलेलं हे नातं असंच महत्त्वाचं आहे. या नात्यामुळे मी खूप आनंदित आहे. त्यामुळे माझा हा आनंद सर्वांबरोबर मी शेअर करत आहे. का मला आनंदात राहण्याचा अधिकार नाही का?’
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीतही तिने तिच्या नव्या नात्याबद्दल भाष्य केलं ‘हो मी आता आयुष्यात पुढं गेले आहे. माझ्या त्याच्याशी असलेलं हे नातं मैत्रीपेक्षा अधिक आहे. आमच्या दोघांमध्ये कोणत्याही प्रकारची कमिटमेंट नाही असंही नाही. मला माझं आयुष्य जगायचं आहे. माझं आयुष्य मुलांबरोबर घालवायचं आहे. त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास द्यायचा नाही. परंतु आम्हा दोघांमधील नातं अत्यंत सन्मानाचं आहे. एक चांगली सवय आहे. तुम्ही काही वेगळ करत असाल तरी लोक तुमच्याबद्दल वाईटच बोलतात.'(Aaliya Siddiqui Bf)
हे देखील वाचा – आशिष विद्यार्थी यांच्या दुसऱ्या लग्नावर लेकाने केलं भाष्य
आलियानं तिच्या आयुष्यात आलेल्या व्यक्तीबद्दल भाष्य करताना म्हटलंय की, ‘मी त्याची खूप आभारी आहे. तो खऱ्या अर्थानं चांगला माणूस आहे. त्याच्या बुद्धिमत्तेमुळे मी खूपच प्रभावीत झाली आहे. तो अतिशय सज्जन व्यक्ती असून माझा आदरही करतो. तो भारतामधील नसून इटलीचा आहे. आम्ही दोघं दुबईत भेटलो. तो माझा आदर करतो आणि माझी खूप काळजी घेतो. आम्ही अनेक दिवसांपासून एकमेकांचे मित्र आहोत.’
