रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘सिंघम अगेन’मधून सलमान खान बाहेर, रोहित शेट्टी व अजय देवगणने अचानक घेतला निर्णय, पण यामागचं कारण काय?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 22, 2024 | 7:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Salman Khan Singham Again Movie

'सिंघम अगेन'मधून सलमान खान बाहेर, रोहित शेट्टी व अजय देवगणने अचानक घेतला निर्णय

Salman Khan Singham Again Movie : रोहित शेट्टीचा ‘सिंघम अगेन’ हा चित्रपट पुढील महिन्यात दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात खूप मोठी कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे. ज्यामध्ये चुलबुल पांडे म्हणजेच सलमान खान देखील झळकणार होता. त्याच्या कॅमिओ भूमिकेची खूप चर्चा होत होती, मात्र आता चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव भाईजान यापुढे या चित्रपटात दिसणार नाही, असे ताज्या अहवालात म्हटले गेले आहे. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, सलमान खान यापुढे ‘सिंघम अगेन’ या चित्रपटाचा भाग असणार नाही. सलमानला सतत मिळणाऱ्या जीवे मारण्याच्या धमक्यांदरम्यान हा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे त्याच्या सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे.

रिपोर्टनुसार, ‘मुंबईच्या गोल्डन टोबॅकोमध्ये एक दिवसाचे शूटिंग होणार होते, पण बाबा सिद्दिकीच्या हत्येमुळे शूटिंग रद्द करण्यात आले. यानंतर, रोहित व अजयने अंतर्गत चर्चा केली आणि लक्षात आले की या वादात सलमान खानला शूट करण्याची विनंती करणे असंवेदनशील आहे. चित्रपटाला अजून सेन्सॉर बोर्डाकडे जायचे आहे, त्यामुळे त्यांनी सलमानच्या अनुपस्थितीशिवाय तो सीबीएफसीकडे जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या बातमीनुसार, पोस्ट-क्रेडिट सीनमध्ये चुलबुल पांडेचा बॅकशॉट देखील असू शकतो. मात्र याबाबत अधिकृत असे काही स्पष्टीकरण समोर आले नाही.

आणखी वाचा – Paaru Marathi Serial : देवीच्या इच्छेनुसार पारू-आदित्य पुन्हा एकत्र, अहिल्यादेवींची मोठी सून होण्याचा मान मिळणार का?, काय घडणार?

View this post on Instagram

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

सलमान खानने ‘दबंग’ चित्रपट आणि त्याच्या सिक्वेलमध्ये चुलबुल पांडेची भूमिका साकारली आहे. चाहत्यांना त्याची स्टाइल व स्वॅग खूप आवडतात. ‘सिंघम अगेन’ हा चित्रपट पोलिसांच्या विश्वाचा एक भाग आहे. यामध्ये सर्व कलाकार पोलिसांच्या भूमिकेत आहेत. अजय बाजीराव सिंघमची भूमिका साकारत आहे तर दीपिका ‘लेडी सिंघम’ची भूमिका साकारत आहे. इन्स्पेक्टर संग्राम भालेराव किंवा ‘सिम्बा’चा रणवीर सिंग, ‘सूर्यवंशी’चा वीर सूर्यवंशी म्हणजेच अक्षय कुमारही दिसणार आहेत. अशा परिस्थितीत रोहित शेट्टीलाही चुलबुल पांडेला त्याच्या चित्रपटात छोट्या भूमिकेसाठी आणायचे आहे.

आणखी वाचा – Paaru Marathi Serial : देवीच्या इच्छेनुसार पारू-आदित्य पुन्हा एकत्र, अहिल्यादेवींची मोठी सून होण्याचा मान मिळणार का?, काय घडणार?

१२ ऑक्टोबर रोजी बाबा सिद्दीकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याची जबाबदारी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीतील सदस्याने घेतली होती. सलमानच्या जवळ राहणाऱ्या लोकांनाही इशारा देण्यात आला आहे. या हल्ल्यानंतर सलमानची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. आता ४० गार्ड आणि वाय कमांडो शेरासह त्याच्या सुरक्षेत सामील झाले आहेत.

Tags: salman khan death threatsSalman Khan Singham Again Moviesingham again movie
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
23 october 2024 Wednesday daily horoscope auspicious day for Aries, Taurus and Pisces know more

23  october Horoscope : मेष, वृषभ व मीन या राशींसाठी बुधवारचा दिवस शुभ असेल, इतरांच्या नशिबात काय? जाणून घ्या...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.