Bigg Boss Marathi Suraj Chavan And Vaibhav Chavan : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ च्या विजेतेपदाचा बहुमान टिक टॉक स्टार सूरज चव्हाणने पटकावला. सर्वत्र सूरज चव्हाणचं भरभरुन कौतुक करण्यात आलं. प्रेक्षकांच्या प्रेमापोटी आणि त्याच्या स्वभावाने सूरज यंदाच्या पर्वाचा विजेता ठरला. ‘बिग बॉस’ विनर सूरज चव्हाणचा १९ ऑक्टोबर रोजी त्याचा ३० वा वाढदिवस होता. यंदाचा हा वाढदिवस सूरजने मुंबईत साजरा केला. वाढदिवसादिवशी ‘कलर्स मराठी’चे प्रोग्रामिंग हेड केदार शिंदेंची सूरजने भेट घेतली. शिवाय ‘बिग बॉस’मधील त्याच्या सहस्पर्धकांनीही सूरजला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या दिसल्या. ‘बिग बॉस’ संपलं असलं तरी या शोची, शोमधील स्पर्धकांची क्रेझ काही कमी झालेली नाही.
सूरज चव्हाणचे ‘बिग बॉस’च्या घरात सर्वच स्पर्धकांशी चांगले नाते होते. टीम बी मधून खेळणारा सूरज टीम ए मधील स्पर्धकांशीही मिळून मिसळून वागताना दिसला. यंदाच्या पर्वात टीम ए मधील वैभव चव्हाणची सूरजशी तितकी मैत्री दिसली नसली तरी बाहेर आल्यानंतर ते बरेचदा एकत्र फिरताना दिसले. ‘बिग बॉस’मधून बाहेर आल्यानंतर वैभवने सूरजची भेट घेतली. आता सूरजच्या वाढदिवसानिमित्त वैभवने खास पोस्ट शेअर केलेली पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा – सोनाक्षी सिन्हाने फ्लॉन्ट केलं मंगळसूत्र, डिझाइन आहे फारच खास, बनवण्यासाठी लाखो रुपये खर्च केले कारण…
वैभवने सूरजला हटके शुभेच्छा देत त्यांचा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसादिवशी सूरज मुंबईत असल्याने वैभवने त्याचा वाढदिवस उशिरा साजरा केला. खास ‘झापुक झुपूक सूरज’ असं लिहिलेला चॉकलेट केक त्याने सूरजसाठी आणला होता. केक कट केल्यानंतर सूरज व वैभवने गोलीगत स्टाइलवर डान्स केल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर वैभवने सूरजला थेट खांद्यावर उचलून घेतलं. या दोघांमधल्या बॉण्डिंगचं सध्या नेटकरी कौतुक करत आहेत. हे सगळे क्षण वैभवने एका व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
आणखी वाचा – वडील झाल्यानंतर प्रिन्स नरुलाचा आनंद गगनात मावेना, पहिल्यांदाच दाखवला लेकीचा चेहरा, एकटक बघतच बसला अन्…
“सूरज भावा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. लेट पण थेट. तुला कायम सगळ्यांनी असंच खांद्यावर उचलून धरावं आणि तू खूप यशस्वी व्हावं हिचं ईश्वर चरणी प्रार्थना. बाकी आम्ही सगळे तुझ्याबरोबर आहोतच. जय शिवराय”, असं कॅप्शन देत वैभवने हा बर्थडे सेलिब्रेशनचा व्हिडीओ शेअर केला आहे. नेटकऱ्यांनी देखील या व्हिडीओवर कमेंट करत दोघांचं कौतुक केलं आहे.