मराठी मालिकांच्या यादीत अग्रेसर असलेली एक मालिका म्हणजे आई कुठे काय करते. सामान्य गृहिणीच्या , एका आईच्या जीवनाभोवती फिरणारी कथा या मालिकेची आहे. अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर या मालिकेत मध्यवर्ती भूमिकेत आहे. मालिकेच्या कथेमुळे प्रचंड मोठ्या प्रेक्षक वर्गा कडून हि मालिका पाहिली जाते. मालिकेत सध्या एकीकडे आनंद तर एकीकडे भांडणाचे हलके वारे वाहू लागले आहेत. (Aai Kuthe Kay Karte Serial Today Episode)
अरुंधतीच दुसरं लग्न होऊन अरुंधती गोखल्यांच्या घरी गेली आणि देशमुख कुटुंब थोडं अस्थाव्यस्थ झालेले पाहायला मिळालं. देशमुख कुटुंबात आता वट पौर्णिमेची तयारी सुरु आहे कांचन आई पौर्णिमेची पूजा करताना दिसणार आहेत. तर इशा देखील अनिष्ट साठी उपवास करणार असल्याचा हट्ट धरताना पाहायला मिळते. आजच्या भागात कांचन आई संजना उपवास धरणार आहेस का विचारतात तेव्हा संजना म्हणते मी कोणासाठी उपवास धरू? या अनिरुद्धसाठी तर ते शक्य नाही. कारण आता त्यालाच माझ्या सोबत राहायचं नाही. मग मी कशाला त्याच्यासाठी उपवास वैगरे धरू. आणि अनिरुद्ध आणि संजना मध्ये या गोष्टीवरून वाद पाहायला मिळतो.

तर दुसरीकडे अशितोष अरुंधतीच्या आठवणीत रमल्याचं दिसतो. तिच्या आठवणीत तो तानपुरा घेऊन अरुंधतीच्या आवडीचं गाणं देखील म्हणतो. मालिकेच्या पुढच्या भागात अखेर अरुंधती घरी परतणार असल्याचं पाहायला मिळालं. अरुंधतीला [आहातच आशुतोष तिला घट्ट मिठी मारतो. अरुंधती परतल्याच आनंद आशुतोष आणि गोखले कुटुंबाच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतोय.(Aai Kuthe Kay Karte Serial Today Episode)
आता मालिकेत अरुंधतीला ती नसताना घडलेल्या गोष्टी समजणार का? त्यावर अरुंधतीची काय रिअक्शन असणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.