सहज अभिनयामुळे अभिनेत्री नीना गुप्ता यांनी त्यांची कामाची छाप पाडली आहे. बधाई हो, पंचायत,वध यांसारखे अनेक चित्रपट त्यांनी केले आहेत.अभिनयसोबतच दिग्दर्शन आणि निर्मितीची धुरा ही त्या सांभाळतात.अनेक पुरस्कारांनी देखील त्यांना गौरवण्यात आलं आहे. त्यांचं बोल्ड आणि डॅशिंग व्यक्तिमत्वामुळे त्याने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे.
त्याचसोबत नीना गुप्ता त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतात.काही त्यांच्या गरोदरपणाच्या मुद्यावरून देखील त्या चर्चेत आल्या होत्या.जयपूरला एक शूटिंग दरम्यान त्या क्रिकेटपट्टू विवियन रिचर्डला भेटल्या. तिथेच त्यांची ओळख झाली. प्रेम झाले. पंरतु विवियन रिचर्ड विवाहित होते. क्रिकेटचे सामने संपल्या नंतर ते त्यांच्या मायदेशी परतले. त्या नंतर नीना यांना कळले की त्या गरोदर आहेत.
तेव्हा त्यांनी विवियन रिचर्ड यांना फोन करून सांगितले. आणि त्यांनी नीना यांना या बाळाला जन्म देण्यास सांगितला.त्यावेळी सुरुवातीला नीना यांना घरातून फार विरोध झाला.परंतु त्या मागे हटल्या नाहीत, नंतर निनांच्या वडिलांनी त्यांना पाठींबा दिला. आणि मग हळू हळू इतरांचा विरोध देखील मावळला.आणि नीना यांनी मसाबा या त्यांच्या कन्या रत्नाला जन्म दिला. मसाबाला त्यांनी सत्याची पूर्ण जाणीव दिली. मसाबा आहे नामाकिंत फॅशन डिझाइनर म्हणून ओळखली जाते.

४ जूनला नीना यांचा वाढदिवस होता. त्या निमित्त मसाबाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून निनांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, त्यात तिने नीना यांना कसं वाटत आहे, असे विचारले आहे. त्यात नीना म्हणाल्या आहेत, मला दिलेल्या गिफ्ट साठी धन्यवाद,६० व्या वाढदिवसानंतर जे वाढदिवस येतात त्यांना लोकांनी शुभेच्छा देण्याऐवजी शोक व्यक्त केला पाहिजे, कारण आपलं जगण्याचं वय कमी होत जातं.त्यामुळे मला असा काही वाढदिवसाचा आनंद नाही आहे. मी माझ्या घरी बसले आहे, माझ्या आवडीचं छान जेवण बनवून घेणार आणि माझ्या कुटुंबासोबत जेवणार.या व्हिडिओवर कमेंट करून अनेकांनी नीना यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.