टीव्हीवरील लोकप्रिय शो ‘बिग बॉस १८’ प्रेक्षकांमध्ये आपले स्थान निर्माण करण्यात यशस्वी होत आहे. यात विवियन डिसेना, शिल्पा शिरोडकर यांच्यासह अनेक प्रसिद्ध चेहरे पाहायला मिळत आहेता. यापैकी ‘व्हायरल भाभी’ म्हणजेच हेमा शर्मानेही प्रवेश घेतला असून् बिग बॉसनंतर त्यांचे वैयक्तिक आयुष्य खूप चर्चेत आले आहे आणि या चर्चेचं कारण म्हणजे हेमाच्या माजी पतीने तिच्यावर केलेले गंभीर आरोप. ‘बिग बॉस १८’ मध्ये धुमाकूळ घालणाऱ्या व्हायरल भाभीवर तिच्या पतीने खळबळजनक आरोप केले आहेत. गौरव सक्सेना असं हेमाच्या पतीचे नाव असून त्याने अलीकडेच त्याच्या ‘गौरव की कहानी’ या यूट्यूब चॅनेलवर पत्नी हेमा शर्माने आपल्यावर लावलेल्या खोट्या आरोपांबद्दल भाष्य केलं आहे. (Hema Sharma Accused by Ex Husband)
हेमाने केलेल्या आरोपांबद्दल गौरव म्हणतो की, तो एक व्हिडीओ बनवत आहे आणि तो चॅनलवर पोस्ट करत आहे. जेणेकरून त्याचा मुलगा मोठा होईल तेव्हा त्याला त्याच्या आणि हेमामधील संपूर्ण प्रकरण समजेल. सध्या त्यांचा मुलगा अडीच वर्षांचा आहे. हेमा आपल्या मुलाला भेटू देत नसल्याचा दावाही गौरवने या व्हिडीओमधून केला आहे. हेमाला पहिल्या लग्नापासून एक मोठा मुलगा असून तो त्याच्या वडिलांना भेटू शकत नाही आणि माझा मुलगाही आता मला भेटू शकत नाही, असा दावाही गौरवने केला आहे.
गौरवने पुढे असं म्हटलं आहे की, “हेमाने माझ्याकडून २.५ कोटी रुपयांचे २ बीएचके घर मागितले होते. हेमा म्हणाली होती की जर मी घर घेतले नाही तर ती मला तिच्या मुलाला भेटू देणार नाही. मी हेमाला नेहमीच पैसे देत आलो आहे. सध्या ती राहत असलेल्या घराचा खर्चही मी उचलतो. मार्च २०२४ पर्यंत मी दरमहा तीन ते चार लाख रुपये देत होतो. एप्रिलमध्ये विभक्त झाल्यानंतर मी दरमहा एक लाख रुपये देतो, पण तरीही ती राहत असलेल्या घराचा खर्च मी उचलतो”.
आणखी वाचा – सुप्रसिद्ध अभिनेत्याला मातृशोक, वयाच्या ८६ व्या घेतला अखेरचा श्वास, कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर
हेमाने गौरववर आपल्या मुलाचे अपहरण केल्याचा आरोपही केला आहे. मात्र, गौरवचा दावा आहे की, हेमाला त्याच्याबरोबर वेळ घालवता यावा म्हणून त्याने हे मुल स्वेच्छेने तिला दिले आहे. दरम्यान, हेमाने आपल्या मुलाला न सांगता मागे सोडल्याबद्दलही त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. सहानुभूती मिळविण्यासाठी ती शोमध्ये त्याच्याबद्दल वाईट बोलू शकते असा तिचा विश्वास आहे. मात्र, या संदर्भात हेमा यांच्याकडून अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही.