Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ गेल्या १६ वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. ही देशातील सर्वात जास्त काळ चालणारी मालिका आहे. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना ही मालिका वेड लावते. प्रेक्षक ‘तारक मेहता…’ बद्दल इतके वेडे आहेत की त्यांना ‘दयाबेन’ दिशा वकानीपासून ते शोचा भाग नसलेल्या इतर कलाकारांपर्यंत अनेक कलाकारांची आठवण नेहमीच येते. दयाबेन, जेठालाल, पोपटलाल यांच्यापासून ते टप्पू सेनेपर्यंत अगदी गोकुळधाम सोसायटीचे नावही प्रेक्षकांच्या लक्षात राहिले आहे. पण ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेचे चित्रीकरण नेमकं कसं होतं याबाबत फार कमी जणांना ठाऊक असेल.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेचे शूटिंग एकाच ठिकाणी होते आणि ते म्हणजे गोकुळधाम सोसायटी. मुंबईतील गोरेगाव येथील फिल्मसिटीमध्ये या सोसायटीचा सेट तयार करण्यात आला आहे. हा सेट बाहेरुन सोसायटीसारखा दिसत असला तरी आतमध्ये रिकामी आहे. मालिकेचे चित्रीकरण दोन भागांमध्ये विभागलेले आहे. एका भागात गोकुळधाम सोसायटीचा बाहेरचा भाग आणि दुसऱ्या भागात सर्व गोकुळधाम रहिवाशांचे फ्लॅट आहेत.
आणखी वाचा – Video : सात वर्षांची आहे बादशाहची लेक, घटस्फोट झाला पण मुलीशी जवळीक, रॅपही करते अन्…
एका भागात गोकुळधाम सोसायटीचे कंपाऊंड तर दुसऱ्या भागात घर दाखवले आहे. येथे फक्त घराचे व बाल्कनीचे बाहेरील भाग शूट केले जातात. कोणतेही आऊटडोअर शूट असेल तर ते सेटवरच बांधलेल्या कंपाऊंडमध्ये केले जाते. पण शूटिंग कुणाच्या घरातील करायचं असेल तर शूटिंग या सेटवर नाही तर कांदिवलीत केलं जातं. २०२३ मध्ये, एका YouTuber ने ‘तारक मेहता…’ची शूटिंग कशी होते आणि गोकुळधाम सोसायटी कशी दिसते हे दाखवले होते. सोनिया माहमी नावाच्या या व्लॉगरने दाखवले होते की, शोच्या कलाकारांना सेटवरच क्वार्टर, एक किचन आणि प्ले एरिया आहे. तर जेठालाल यांचे इलेक्ट्रॉनिक स्टोअरही बनवण्यात आले आहे की ते अगदी खरे वाटेल.
आणखी वाचा – Video : जिनिलीया देशमुखचा नवरा, मित्र-मंडळींसह घरातच भयंकर वेडेपणा, गाणं वाजताच बेभान होऊन नाचले अन्…
वापरात नसलेल्या सेटवर बांधलेले क्वार्टर्स किंवा फ्लॅट्स मोठ्या पत्र्याने झाकले जातात जेणेकरून ते घाण होऊ नये. ‘तारक मेहता…’मधील गोकुळधाम सोसायटीला ‘मिनी इंडिया’ किंवा आठवे आश्चर्य देखील म्हटले जाते, कारण येथे विविध धर्म व जातीचे लोक एकत्र राहतात. या शोने दिशा वकानी, दिलीप जोशी, अमित भट्ट, शैलेश लोढा आणि मुनमुन दत्ता यांच्यासह जवळपास प्रत्येक कलाकाराला प्रसिद्धी मिळवून दिली.