Riteish Deshmukh And Genelia Deshmukh Funny Reel Video : सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपलच्या यादीत एका जोडीचं नाव आवर्जून घेतलं जात ते म्हणजे अभिनेता रितेश देशमुख व अभिनेत्री जिनिलिया देशमुख. रितेश व जिनिलिया दोघांच्या बॉण्डिंगचे लाखो चाहते दिवाने आहेत. बॉलिवूडसह मराठीमधील एक आदर्श जोडपं म्हणून बरेचदा या जोडीचं उदाहरण दिलं जातं. महाराष्ट्राचे लाडके दादा-वहिनी म्हणून ते ओळखले जातात. अनेकदा जिनिलिया रितेशबरोबर स्पॉट होताना दिसते. रितेश व जिनिलीयाही जोडी मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत प्रचंड लोकप्रिय आहे. या जोडप्याचा मराठीसह बॉलीवूडमध्ये प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे.
जवळपास ९ वर्ष एकमेकांना डेट केल्यावर २०१२ मध्ये त्यांनी एकमेकांशी लग्न केले. रितेशला प्रत्येक गोष्टीत जिनिलीयाने खंबीरपणे साथ दिली. सोशल मीडियावर ही जोडी नेहमीच सक्रिय असते. हे दोघे नेहमीच काही ना काही मजेशीर व्हिडीओ शेअर करत असतात. त्यांच्या दोन्ही मुलांचे अनेक रीलही ते शेअर करत असतात. अशातच जिनिलियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केलेल्या एका फनी रील व्हिडीओने साऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
जिनिलियाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये रितेशसह त्यांचे काही मित्रमंडळी धमाल मस्ती करताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये जेनेलिया, रितेश आणि त्यांचे मित्र हे ‘चिकनी चमेली’ या गाण्यावर ठेका धरताना दिसत आहेत. जेनिफर विंगेट, कांची कौल, आशिष चौधरी, शब्बीर अहलूवालिया, मुश्ताक शेख, समिता बांगर्गी हे सगळे कलाकार रितेश-जिनिलीयाबरोबर या व्हिडीओमध्ये तुफान धमाल करताना दिसत आहेत. त्यांचा हा गमतीशीर रील व्हिडीओ अनेकांच्या पंसतीस पडलेला पाहायला मिळत आहे. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत त्यांचं कौतुक केलं आहे. आणि व्हिडीओवर लाईक्सचा वर्षाव केला आहे.
जिनिलिया व रितेश ही लोकप्रिय जोडी आहे. दोघंही मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून दोघांनी मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केले. त्याचवेळी दोघांची मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर १० वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघंही लग्नबंधनात अडकले. रितेश व जेनिलिया यांचे लग्न धुमधडक्यात पार पडले होते.