रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुखी संसाराची २५ वर्षे! लग्नाच्या वाढदिवसाला डॉ. नेनेंकडून माधुरी दीक्षितचं तोंडभरुन कौतुक, Unseen फोटो समोर

Saurabh Moreby Saurabh More
ऑक्टोबर 18, 2024 | 10:36 am
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Madhuri Dixit 25th wedding Anniversary husband Dr. Shriram Nene give special wishes to wife

लग्नाच्या २५ व्या वाढदिवसानिमित्ताने माधुरी दीक्षितला डॉ. श्रीराम नेनेंकडून खास शुभेच्छा

बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितने १७ ऑक्टोबर रोजी तिच्या लग्नाचा २५ वा वाढदिवस साजरा केला. १७ ऑक्टोबर १९९९ मध्ये माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने लग्नबंधनात अडकले होते. १७ ऑक्टोबर १९९९ पासून ते आजपर्यंत माधुरी आणि नेने यांचा सुखाचा संसार सुरु आहे. अशातच गुरुवारी त्यांचा लग्नाचा २५ वा वाढदिवस साजरा झाला आणि यानिमित्ताने दोघांनी रोमँटिक पोस्ट शेअर करत एकमेकांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. लग्नाच्या २५ व्या वाढदिवसानिमित्ताने श्रीराम नेने यांनी इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्टही शेअर केली आहे. या व्हिडीओमध्ये ते माधुरीला लग्नाचा प्रस्ताव देताना दिसत आहे. तसंच त्यांनी माधुरीला त्यांची ‘चिरंतन प्रेयसी’ही म्हटलं आहे. (Madhuri Dixit and Shriram Nene)

श्रीराम नेनेंनी या व्हिडीओच्या सुरुवातीला माधुरीला प्रपोज केलं असून माधुरीने त्यांना ‘हो’ उत्तर दिलं आहे. तसंच या व्हिडीओमध्ये त्यांनी माधुरीबरोबरचे काही खास क्षण शेअर केले आहेत आणि म्हटलं आहे की, “जसे कोणीतरी म्हटलं आहे की, दोन ह्रदये जे एकत्र धडधडतात. माझ्या सोबती आणि प्रिय व्यक्तीला लग्नाच्या २५ व्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा. दयाळू आत्मा आणि सर्वात सुंदर स्मितसह, सर्व मार्गांनी तू माझ्यासाठी या ग्रहावरील सुंदर स्त्री आहेस. आम्ही जवळपास आमचे अर्धे आयुष्य एकत्र घालवले आहे, आठवणी बनवल्या आहेत, जे आमच्या आयुष्यातील सर्वोत्तम वर्षे आहेत आणि खूप मजाही केली आहे”.

View this post on Instagram

A post shared by Dr. Shriram Nene (@drneneofficial)

आणखी वाचा – Bigg Boss फेम अभिजीत सावंतने सुरु केलं व्लॉगिंग, बायकोबरोबरचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल

माधुरीनेही एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये माधुरी आणि डॉ. श्रीराम नेने यांचे अनेक फोटो पाहायला मिळत आहेत. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये माधुरीने लिहलं आहे की, “२५ वर्ष प्रेम, हास्य आणि तुझ्याबरोबरच्या असंख्य आठवणी. लग्नाच्या २५ व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा”. या पोस्टवर नेटकऱ्यांनीही शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. या व्हिडीओला अनेक कलाकार व चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्स करत शुभेच्छा दिल्या आहेत. “लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा”, “आमची आवडती जोडी”, “असेच कायम एकत्र राहा” अशा अनेक कमेंट्स करत नेटकऱ्यांनी या व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे.

View this post on Instagram

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene)

आणखी वाचा – 18 0ctober Horoscope : शुक्रवारी मेष, वृषभ यासह ‘या’ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल, अधिक जाणून घ्या…

दरम्यान, माधुरी आणि श्रीराम यांच्याबद्दल सांगायचे झाले तर यांचा विवाह १७ ऑक्टोबर १९९९ रोजी दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये पारंपारिक पद्धतीने झाला. त्यानंतर  माधुरीने २००३ मध्ये पहिला मुलगा अरिन आणि २००५  मध्ये दुसरा मुलगा रायनला जन्म दिला. गेले २५ वर्षे ही जोडी एकत्र राहत असून या जोडीचे नेहमीच कौतुक केलं जातं. अशातच त्यांचा हा नवीन व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

Tags: Madhuri Dixit and Shriram Nene Wedding 25th AnniversaryMadhuri Dixit and Shriram Nene Wedding 25th Anniversary NewsMadhuri Dixit and Shriram Nene Wedding Anniversary
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Salman Khan Receives New Death Threat 

"हलक्यात घेऊ नका", सलमान खानला लॉरेन्स बिष्णोई गॅंगकडून पुन्हा धमकी, केली 'इतक्या' कोटींची मागणी अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.