Ankita Walavalkar Husband : ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व विशेष गाजताना दिसलं. यंदाच्या या पर्वात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सची हवा असलेली पाहायला मिळाली. यंदाच्या या पर्वात कोकणहार्टेड गर्ल अंकिता वालावलकरच्या एन्ट्रीने साऱ्यांच्या भुवया उंचावल्या. अगदी पहिल्या दिवसापासून अंकिता उत्तम खेळ खेळत टॉप ५ पर्यंत पोहोचली. मात्र टॉप ५ मध्ये पाचव्या क्रमांकावर अंकिताला हा खेळ सोडावा लागला. घराबाहेर आल्यानंतर आणि घरात असतानाही अंकिताच्या व्यवसायिक आयुष्याबरोबरच वैयक्तिक आयुष्याची विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळाली.
अंकिताने ‘बिग बॉस’च्या घरात असताना घरात जाण्यापूर्वी प्रेमाची कबुली दिली मात्र तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव हे गुपित ठेवलं असल्याचे समोर आलं. अंकिता वालावलकरचा होणारा नवरा नेमका कोण आहे, हा प्रश्न साऱ्यांना सतावत होता. अखेर अंकिताने या प्रश्नावर पूर्णविराम दिलेला पाहायला मिळतोय. घरातून बाहेर आल्यानंतर सगळेचजण अंकिताला आता तरी सांग तुझा होणारा नवरा कोण आहे, अशी विनंती करताना दिसले. यावर अंकिताने दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर मी याचा उलगडा करेन असं सांगितलं होतं आणि त्यानुसार आज दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर अंकिताने तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा फोटो शेअर करत सुंदर असं कॅप्शन दिलेलं पाहायला मिळत आहे.
“सूर जुळले”, असे म्हणत अंकिताने कुणाल भगतबरोबरचा फोटो शेअर केला आहे. संगीत दिग्दर्शक कुणाल भगत व अंकिता वालावलकर ही जोडी लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याचे समोर आले. बरेच दिवसापासून अंकिता व कुणालच्या नावाची चर्चा होती. मात्र अंकिताने याबाबत कोणताही घोषणा केली नव्हती. अखेर अंकिताने आज कुणाल आणि तिच्या नात्याचा खुलासा केला असल्याचं समोर आलं आहे. अंकिताच्या नवऱ्याने म्हणजेच कुणालने शेअर केलेल्या पोस्टखाली कॅप्शन देत त्याने, “तु आयुष्यात आलीस आणि खरं प्रेम या शब्दाचा अर्थ कळला. आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा निर्णय. आपण लग्न करतोय.
तुला खुश ठेवणं, तुला हसवणं, आता माझी सवय झाली आहे. आणि ही माझी सवय नेहमी आशीच ठेवेन. विश्वास ठेव. माझ्या सोन्यासारख्या होणाऱ्या बायकोला दसऱ्याच्या शुभेच्छा”.तर अंकिताने एक पोस्ट शेअर करत त्याखाली कॅप्शन देत, “प्रेम हे एकमेकांसाठी जगणं आहे हे तू सांगीतलस. काळाच्या ओघात कळलच नाही.
आयुष्य कसं कुठे बदललं,
तू भेटलास आणि पुन्हा जगावसं वाटलं. वचन देते एका सुखी कौटुंबिक आयुष्याची तुझी सहचारिणी असेन. दसऱ्याच्या शुभेच्छा”, असं म्हटलं आहे.
आणखी वाचा – ना अवाढव्य खर्च, ना महागडे कपडे; सुप्रसिद्ध अभिनेत्याने गर्लफ्रेंडसह गुपचूप उरकलं लग्न, साधेपणाचं कौतुक
अंकिताच्या नवऱ्याने म्हणजेच कुणालने ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर आल्यानंतर खास तिच्यासाठी या विजयाचं जंगी सेलिब्रेशन अरेंज केलं आहे. फुग्यांचे डेकोरेशन करत त्याने हे खास सेलिब्रेशन आयोजित केलं आहे. अंकीताला तिच्या नवऱ्याकडून मिळालेलं हे खास सरप्राइज पाहुन तिचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. तिने ही पोस्ट शेअर करत “thank you नवऱ्या” असं म्हणत त्याचे आभारही मानले आहेत.