Nikki Tamboli On Leeza Bindra : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ संपलं असून अजूनही या शोची क्रेज काही कमी झालेली दिसत नाही. यंदाच्या या पर्वात निक्की तांबोळीने हवा केलेली पाहायला मिळाली. निक्कीने ‘बिग बॉस’च्या घरात अगदी पहिल्या दिवसापासून धुमाकूळ घालायला सुरुवात केली. निक्कीने हे पर्व विशेष गाजवलं. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात निक्की व अरबाजची विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. दोघांमधील मैत्रीचे प्रेमात रूपांतर झालेलं पाहायला मिळालं. आता घराबाहेरही निक्की अरबाजबरोबर एकत्र स्पॉट होताना दिसली. इतकंच नव्हे तर अरबाजचा भूतकाळ समोर येऊनही निक्कीने अरबाजला स्वीकारलं. अरबाज व लिझा बिंद्रा हे रिलेशनमध्ये होते.
मात्र ‘बिग बॉस’च्या घरात अरबाज व निक्कीला एकत्र पाहून लिझा दुखावली. घराबाहेर आल्यानंतर अरबाजने लिझाबरोबरच्या सगळ्या पोस्ट डिलीट केल्या. आता अरबाज व निक्की एकत्र आले आहेत. निक्कीने तर अरबाजबरोबरच्या प्रेमाची कबुलीही दिली आहे. घराबाहेर आल्यानंतर आता निक्कीने अरबाजच्या एक्स गर्लफ्रेंडबाबत केलेलं भाष्य चर्चेत आलेलं आहे. निक्कीने मीडियाशी साधलेल्या संवादादरम्यान असं म्हटलं की, “मी सगळं काही बोलणार आहे. मी कोणाचं नाव घेऊन बोलणार नाही आहे. कारण मला मुलगा वा मुलगी कोणालाच कमजोर म्हणायचं नाही आहे. बस, आपापल्या आयुष्यात खुश राहा”.
आणखी वाचा – Phullwanti Movie Review : कॅमेरामॅनच्या नजरेतून फुलली ‘फुलवंती’
पुढे निक्की म्हणाली, “आज तो मुलगा तुझ्या आयुष्यात नाही म्हणून त्याला काही बोलू शकत नाही वा माध्यमांसमोर येत तुम्ही काहीही बोलू शकत नाही. कारण हे एक आयुष्य आहे. आज जर तुम्ही लोकांना खरं खोटं सांगत असाल तर देवाकडे गेल्यावर जेव्हा देव तुम्हाला पावती देत असेल तेव्हा त्यात तुमचे कर्म लिहिलेले असणार आहे. त्यामुळे स्वर्गात जाणार की नरकात हे त्याला ठरवू द्या. तुम्ही इथे कॅमेरासमोर वाईट बनू नका. मलाही सगळे लोक मॅसेज करुन त्याचं लग्न झालं आहे असं सांगत आहेत पण आता मी या सगळ्याच्या पलीकडे गेले आहे” .
पुढे निक्की म्हणाली, “मी या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतेय. तुम्ही एखाद्या व्यक्तीवर प्रेम करत असाल आणि जर ती व्यक्ती तुमच्यापासून दूर गेली तरी तुम्ही त्याचा आदर करा. जर तुमच्यात प्रेम नव्हतं मग तुम्ही गर्लफ्रेंड का बनलात, आणि प्रेम इतकंही कमजोर नसतं की ते तुटलं पाहिजे. प्रेम इतकं स्वस्त पण नका ठेवू की ते तुटल्यानंतर तुम्ही त्या व्यक्तीबद्दल वाईट बोलाल”.