‘बिग बॉस मराठी ५’च्या घरात आलेल्या बारामतीच्या सूरज चव्हाणने यंदाच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. पहिल्या दिवसापासूनच तो ठाम होता की, ट्रॉफी तोच घेऊन जाणार आणि सूरजने ते सिद्ध करुन दाखवले. अवघ्या राज्यभरातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तर घराबाहेर पडल्यानंतर सर्वत्र सूरजच जंगी स्वागत होताना पाहायला मिळत आहे. सूरजची सर्वत्र हवा असलेली पाहायला मिळत आहे. घराबाहेर आल्यानंतर इतर स्पर्धकही चर्चेत आलेले पाहायला मिळत आहे. सूरजबरोबरचं निक्की तांबोळीचीही ‘बिग बॉस’मध्ये हवा सुरु असलेली पाहायला मिळाली. आता निक्कीने सूरजबाबत केलेलं भाष्य चर्चेत आलं आहे. (Nikki Tamboli statement)
निक्कीने नुकतीच इट्स मज्जा या युट्युब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी बोलताना निक्कीला सूरजच्या नावाखाली अनेकांनी क्रेडिट घेतलं, सहानुभूती मिळवली असं तू शोमध्ये बोलली, याबाबत तू काय सांगशील?”. याचं उत्तर देत निक्की म्हणाली, “मी शोमध्ये सुद्धा असं म्हटलं आहे की, काही लोकांनी सहानुभूतीसाठी बरंच काही म्हटलं. उदाहरण द्यायचं तर मी एका रिऍलिटी शोमध्ये बसले आहे, समोर १०० कॅमेरे आहेत. मी तुला भाऊ मानते पण मी तुला कॅमेरासमोर तर असं बोलणार नाही की, मी बाहेर गेल्यानंतर सूरज तुला घर देईल. मी तुला देईलच, पण ते बाहेर जाऊन देईल मग इथे तुम्ही १०० कॅमेरासमोर असं म्हणत आहात म्हणजे तुम्ही सहानुभूतीसाठीचं हे म्हणत आहात. याचा अर्थ हाच होतो”.
पुढे ती असंही म्हणाली की, “यांत शंका नाही की, ते मदत करणार नाहीत. अर्थात ते बाहेर जाऊन मदत करणारच आहेत किंवा भावाचं नातं ते सांभाळतील. पण १०० कॅमेरासमोर मी तुझ्यासाठी बाहेर जाऊन हे करेन असं बोलणं पूर्णतः चुकीचं आहे. एखादं नवं जन्मलेलं बाळही म्हणेल की हे सगळं सहानुभूतीसाठी आहे”. ‘बिग बॉस’च्या घरात असताना सहानुभूतीच्या मुद्द्यावरुन निक्कीने अंकिताचे कान टोचले होते.
एका टास्कदरम्यान अंकिता सूरजला नॉमिनेट करते. तेव्हा निक्की चिडते आणि तिने जपलेली ही नाती सहानुभूतीची वापरत असल्याचं तिने म्हटलं आहे. निक्की अंकिताला म्हणते, “तू इथे सहानुभूती दाखवायला बोललं नाही पाहिजे होतं की मी घर बांधणार आहे”. यावर अंकिताही उत्तर देत म्हणते, “त्याच घर मी बाहेर गेल्यावर बांधणार आहे”. यावर निक्की म्हणते, “हो तेच तू इथे सांगायला नाही पाहिजे होतं. सहानुभूतीसाठी तू इथे बोललीस. तुझे हे डाव आम्हाला चांगले कळतात. तुला घर दिलं याचा इन्स्टाग्रामवर ती फोटोही टाकेल”.