प्रत्येकाला आपल्या आदर्शस्थानी असलेल्या व्यक्तीची भेट घ्यावी असं वाटत असत. असची एक भेट झालीये ती म्हणजे अभिनेत्री राधिका देशपांडे आणि संभाजी भिडे गुरुजी यांची. या भेटीबद्दल एक पोस्ट राधिका देशपांडेने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून केली आहे.(Radhika Deshpande)
पाहा काय आहे राधिकाची पोस्ट(Radhika Deshpande)
भिडे गुरुजी, शब्द पोंक्षे यांच्यासोबतचा एक फोटो पोस्ट करत राधिकाने कॅप्शन मध्ये लिहिलंय “”छडी लागे छम छम”च्या काळातली माणसं
“वयम् मोठम् खोटम्” वाटायला लावणारी इंदिरा आजी १०३ तर भिडे गुरुजी ९०
सांगली मिरजकडे राहणारी ही पिकलेल्या आंब्या सारखी गोड आणि चिरोट्यांच्या पापुद्र्यांसारखी त्यांची कांती, साजूक तुपाचे पावित्र्य आणि वागण्या बोलण्यातला ओलावा? तेवत असलेल्या समयीच्या वातीतला. वटवृक्षाच्या झाडासारखी मातीत घप्प मुळांचे गोफ गुंफित तटस्थ उभी. त्यांना पारंब्या तरी किती!

त्यांच्या सावलीत काही क्षण वेचता आले, पारंब्यांवर झुलता आले.
आजी होती मऊ मऊ. तर गुरुजींच्या नजरेतून एकही गोष्ट सुटली नाही. विलक्षण!मोठेपण यायला बालपण जपून ठेवावे लागते.
करं जोडोनी मागते मी तुजला “लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा”
हे देखील वाचा – ‘मला लग्न झालेली बाई माझ्या चित्रपटात नको आहे’ कोठारेंनी झपाटलेला मध्ये निवेदिता यांना नाकारला रोल
संभाजी भिडे अनेक कारणांनी नेहमी चर्चेत असतात. तर राधिका मनोरंजन विश्वातील एक समृद्ध अभिनेत्री आहे जिने आई कुठे काय करते या मालिके सोबतच अनेक चित्रपट, नाटक आणि मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. राधिकाच्या या पोस्ट वर अनेक चाहत्यांनी देखील कमेंट करत तीच कौतुक केलं आहे.