शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“हिरोईन बनून बाहेर आले आणि…”, जान्हवी किल्लेकरची पहिलीची प्रतिक्रिया, म्हणाली, “महाराष्ट्राला माझा राग पण…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑक्टोबर 8, 2024 | 10:31 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 Janhavi Killekar her first reaction after Grand Finale see the details

Bigg Boss Marathi 5 Grand Finale नंतर जान्हवी किल्लेकरची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाली? जाणून घ्या...

Bigg Boss Marathi Season 5 : गेल्या ७० दिवसांपासून महाराष्ट्रात बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचीच चर्चा होती. मित्रांच्या कट्ट्यापासून ते गावच्या चावडीपर्यंत फक्त ‘बिग बॉस’ने स्पर्धकांना दिलेले टाक्स आणि स्पर्धकांमध्ये होत असलेले वाद यावर चर्चा होत होती. दरम्यान, काल (रविवार ६ ऑक्टोबर) रोजी ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाची सांगता झाली. ग्रँड फिनालेमध्ये गुलिगत धोका हा डायलॉग संबंध महाराष्ट्रात प्रसिद्ध करणारा सूरज चव्हाण विजयी ठरला. सूरज चव्हाणला बक्षीस म्हणून लाखो रुपये मिळाले आहेत. मात्र या सर्व ग्रँड फिनालेमध्ये बिग बॉसची जान्हवी किल्लेकर ही एक स्पर्धक चांगलाच भाव खाऊन गेली आहे. (Bigg Boss Marathi 5 Janhavi Killekar)

बिग बॉस मराठीच्या गँड फिनालेमध्ये एकूण सहा स्पर्धक होते. यामध्ये जान्हवी किल्लेकरचाही समावेश होता. जान्हवी किल्लेकर ही थेट सहाव्या स्थानावर होती. मात्र तिला थेट दुसऱ्या क्रमांकाचं बक्षिस मिळालं आहे. ९ लाख रुपये घेत त्याने या घरातून एक्झिट घेतली. या घरात जान्हवीने केलेल्या अनेक अपमानास्पद वक्तव्यांची चर्चा रंगली होती आणि याचे संपूर्ण महाराष्ट्रभरात पडसाद उमटले. याबद्दल तिला अनेक रोषाला सामोरे लावे लागले. याबद्दल जान्हवीने तिची पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

आणखी वाचा –

‘बिग बॉस मराठी’चा ग्रँड प्रीमियर सोहळा पार झाल्यानंतर जान्हवीने इट्स मज्जाशी संवाद साधला. यावेळी तिने असं म्हटलं की, “बिग बॉसच्या घरात जाण्यामागचा विचार हा होता की आतापर्यंत जान्हवीला सर्वांनी व्हिलन म्हणून पाहिलं आहे. पण जान्हवी खऱ्या आयुष्यात कशी आहे हे बघितलंच नाही. जान्हवी सुरुवातीला व्हिलनच दिसली. पण बिग बॉसच्या बाहेर आल्यानंतर लोकांनी म्हटलं की, जान्हवी व्हिलन म्हणून आत गेली आणि हिरोईन म्हणून बाहेर आली. लोकांचे हे मत मला खूप आवडले. मी चुकले पण मी स्वत:ला सुधरण्याचा खूप प्रयत्न केला. माझ्या चुकीचे मी प्रायश्चितही घेतल आणि मी आता आनंदी आहे”.

आणखी वाचा –

यापुढे तिने असं म्हटलं की, “मी केलेल्या चुकीची शिक्षा भोगली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राने १०० टक्के नाही पण ७० टक्के तरी माझा स्वीकार केला आहे. बिग बॉसच्या घरात जान्हवी अशी नव्हती पण ती  वागली यांचे कारण काय ते माहीत नाही. पण शेवटी जी खरी जान्हवी होती तीच दिसली. लोकांना माझ्याबद्दल प्रॉब्लेम आहेत पण ते स्वाभाविक आहे. त्यांना राग असणारच कारण मी वागलेच तशी. पण या लोकांची मला काही चीड किंवा राग नाही”.

Tags: bigg boss marathi 5Bigg Boss Marathi 5 Janhavi KillekarJanhavi Killekar first reaction
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
singham again trailer

Singham Again Trailer Out : 'सिंघम अगेन'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित, 'रामायण'बरोबर कनेक्शन, टॉपचे कलाकार, डायलॉगबाजी अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.