बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी व मौनी रॉय या नेहमी चर्चेत असलेल्या पाहायला मिळतात. दोघीही बॉलिवूडमधील लोकप्रिय कलाकार आहेत. तसेच त्यांची चर्चादेखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. दिशा व मौनीच्या मैत्रीच्या चर्चादेखील सोशल मीडियावर होताना पाहायला मिळते. नुकतेच दोघींचे काही फोटों समोर आले आहेत ज्यामुळे सगळ्यांचेच लक्ष वेधले गेले आहे. त्यांच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत ज्याकडे सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे. त्यांचे फोटो समोर आले आहेत आणि मोठ्या प्रमाणात व्हायरलदेखील होत आहेत. मात्र त्यांची फॅशन आता त्यांच्यावर भारी पडल्याचेही दिसून येत आहे. (disha patani and mouni roy photos)
मौनी व दिशा या दोघीही घनिष्ट मैत्रिणी आहेत. त्या अत्यंत फॅशनेबलदेखील आहेत. नुकताच दिशाचा वाढदिवस पार पडला. तिच्या वाढदिवसानिमित्त मौनीने काही फोटो शेअर केले आहेत. जुने फोटो समोर आले असून तिने हे अपलोड करत शुभेच्छा दिल्या आहेत. पण हे फोटो नेटकऱ्यांना रुचले नाहीत. त्यामुळे त्यांनी खूप प्रतिक्रिया दिल्या आहेत.
पहिल्या फोटोमध्ये दोघींना आराम करताना बघायला मिळत आहे. दोघींनी स्विमिंग सूट परिधान केला असून समुद्र किनारी धमाल करताना दिसत आहेत. बीच दोघीही खूप सुंदर दिसत आहेत. दिशाने काळ्या-लाल रंगाच्या प्रिंटेड लूकमध्ये दिसून येत आहे. तसेच मौनीने बॅस्टीयर स्टाइल बिकिनी टॉप व मॅचिंग स्विम सूट परिधान केला आहे.
दिशा व मौनी या नेहमी ट्विनिंग व फॅशनसाठी नेहमी चर्चेत असतात. पण त्यांचे फोटो समोर आले तेव्हा नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. एका युजरने प्रतिक्रिया देत लिहिले की, “या दोघी नेहमीच एकत्र असतात का?”, तसेच दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले की, “कोणाला कोणाला वाटतं की या दोघी समलैंगिक आहेत?”, तसेच अजून एकाने लिहिले की, “या दोघींना समलैंगिक जोडी म्हणून एकत्रित चित्रपटात काम करताना पाहण्याची इच्छा आहे”.दरम्यान मौनी व दिशा यांचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.