जस प्रेक्षकांना मनोरंजनासाठी विविध कथांची, कलाकारांची जमजुळणी पाहायला आवडत त्याच प्रमाणे एखादा दिगदर्शक नेहमीचं त्याच्या चित्रपटांमध्ये वेगवेगळे प्रयोग करत असतो. आणि चित्रपट निर्मती मधील शास्त्रज्ञ म्हणून ओळखले जाणारे अभिनेते दिगदर्शक महेश कोठारे यांनी 3d पासून ते अगदी कलाकारांच्या भावनिक हालचाली ओळखून चित्रपटांची निर्मती महेश यांनी केली.(Nivedita Saraf Jhapatlela)
असाच एक प्रसंग होता ज्यात अभिनेत्री निवेदिता सराफ यांचं लग्न झालं आणि या चित्रपटात आता त्या कुठे नुसार काम होणार नाही म्हणून महेश यांनी निवेदिता यांच्या ऐवजी किशोरी आंबिये यांची निवड केली. नक्की काय होता तो किस्सा जाणून घेऊयात इट्स मज्जाच्या आजच्या जपलं ते आपलं या भागात.
तर मंडळी गोष्ट आहे महेश कोठारे यांच्या झपाटलेला या चित्रपटाच्या कास्टिंगची. झपाटलेला या चित्रपटाने अनेक रेकॉर्डस् मोडत अनेक थिएटर्स त्याकाळी झपाटून काढली. महेश लक्ष्याची प्रेक्षकांना हवी असणारी जोडी आणि त्यात एक बाहुला म्हणजेच तात्या विंचू. या तिकडीने संपूर्ण चित्रपटाची कथा आपल्या खांद्यावर लीलया पेलली. आणि त्यांना साथ दिली होती अभिनेते दिलीप प्रभावळकर, किशोरी आंबिये यांसारख्या अनेक कलाकारांनी.(Nivedita Saraf Jhapatlela)

दे दना दन चित्रपटामध्ये महेश आणि निवेदिता यांची जोडी प्रेक्षकांना दिसली होती. त्या नंतर इन्स्पेक्टर महेश जाधव जिथे तिथे निवेदिता सराफ दिसयच्याच. या चित्रपटावेळी ही निवडता सराफ पुन्हा दिसणार अशी अशा प्रेक्षकांना होती पण या वेळी महेश कोठारे यांनी निवेदिता सराफ यांची निवड महेश कोठारे यांनी टाळली.
याच कारण महेश कोठारे यांनी त्यांच्या आत्मचिरत्रात सांगितलं आहे. महेश कोठारे यांनी सांगितलं कि या झपाटलेला या चित्रपटात ज्या प्रेमळ भावनांची गरज नायक नायिके मध्ये दिसावी लागते त्या साठी लग्न झालेली अभिनेत्री महेश कोठारे यांना नको होती. आणि नेमकं त्यावेळी अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांचं लग्न झालं होत. त्यामुळे भूमिकेतून हवी असलेली ती भावना मिळाली नसती म्हणून महेश कोठारे यांनी गौरी हे पात्र निवेदिता सराफ यांच्या ऐवजी अभिनेत्री किशोरी आंबिये यांना दिली.